कृषी विज्ञान केंद्र, पाल येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी वितरण समारोह व भव्य शेतकरी परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन रावेर प्रतिनिधी मुबारक...
कृषी विज्ञान केंद्र, पाल येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी वितरण समारोह व भव्य शेतकरी परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
पाल तालुका रावेर येथील कृषी विज्ञान केंद्र येथे दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ वार -सोमवार रोजी दुपारी १२ वाजता प्रधान मंत्री माननीय श्री नरेंद्र भाई मोदी यांच्या शुभहस्ते भागलपुर (बिहार) या ठिकाणाहून पीएम किसान सन्मान निधीच्या १९ व्या हप्ता वितरण कार्यक्रमा निमित्त दुरुस्थ प्रणाली द्वारे भव्य शेतकरी परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमास प्रमुख अतिथी व उद्घाटक म्हणून मा. नामदार श्रीमती रक्षाताई खडसे (केंद्रीय राज्यमंत्री युवा व्यवहार व क्रीडा लाभणार आहेत
कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक आत्माराम झांबरे (अध्यक्ष, सातपुडा विकास मंडळ, पाल)
विशेष अतिथी आमदार अमोल भाऊ जावळे आमदार, रावेर यावल विधानसभा क्षेत्र) सन्माननीय अतिथी मा. श्री आयुष प्रसाद(भा.प्र.से) जिल्हाधिकारी जळगाव मा. श्री कुरबान तडवी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मा. धनंजय भाऊ चौधरी कार्यकारणी सदस्य ( सा वि मं )
उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत तरी आपण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अजित खुशाल पाटील
सचिव सातपुडा विकास मंडळ, पाल प्रा.महेश विठ्ठल महाजन प्रा.वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र पाल यांनी केले आहे

No comments