शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान तालुका प्रमुख सागर लोहार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे पोलीस निरीक्षक यांना दिले निवेदन भरत कोळी यावल ता. प्रति...
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान तालुका प्रमुख सागर लोहार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे पोलीस निरीक्षक यांना दिले निवेदन
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड )
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ता विकास लवांडे यांनी बेताल वक्तव्य करून धार्मिक भावना भडकावल्या प्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीचे विवेदन शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान तालुका प्रमुख सागर लोहार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले. निवेदनात नमूद केले आहे की, दि.१२ फेब्रुवारी रोजी शरद पवार गटाचा प्रदेश प्रवक्ता विकास लवांडे
यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी यांचेविषयी व दुर्गप्रेमींविषयी बिनबुडाचे वक्तव्य करून त्यांची आतंकवाद्यांशी तुलना केली. यामुळे धारकरी बंधूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. असे वक्तव्य करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान तालुकाप्रमुख सागर लोहार यांच्यासह स्वप्नील करंडे, सागर कोळी, राजश्री, मयूर शिर्के, पार्थ सोनवणे, ऋषिकेश कोळी, कमलेश शिर्के, भरत बारेला, सागर इंगळे आदी धारकऱ्यांनी केली आहे.

No comments