फैजपूरात मुस्लिम कब्रस्थानाचे स्ट्रीट लाईट बंद नगरपालिकेला आंदोलनाचा इशारा इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर येथील मु...
फैजपूरात मुस्लिम कब्रस्थानाचे स्ट्रीट लाईट बंद नगरपालिकेला आंदोलनाचा इशारा
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील मुस्लिम कब्रस्थान मध्ये गेल्या काही महिन्यांपासून स्ट्रीट लाईट बंद असल्याने वारंवार पालिकेत तक्रार रजिस्टर मध्ये नोंद करून सुध्दा काही उपयोग झाला नाही.आता तीन दिवसांच्या आंत हे स्ट्रीट लाईट सुरू झाले नाही तर पालिकेसमोर उपोषणाचा इशारा नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
फैजपूर शहरात काही विविध भागांमध्ये स्ट्रीट लाईट बंद असल्याची नित्याने ओरड असते.आणि कोणत्यातरी भागात दररोज ही समस्या कायम असली तरी सूटता सुटत नाही.येथील मुस्लिम कब्रस्थान मध्ये गेल्या काही महिन्यांपासून स्ट्रीट लाईट बंद असल्याने वारंवार पालिकेत तक्रार रजिस्टर मध्ये नोंद करून सुध्दा काही उपयोग झाला नाही.कब्रस्थानमध्ये रात्रीच्या वेळी दफनविधीला लोक जातात यावेळी बहुतेक ठिकाणी अंधार असतो सापांचा वास्तव असल्याने रात्रीच्या वेळी अंधारात हे साप दिसत नाही.वेळप्रसंगी या ठिकाणी असलेल्या अंधाराचा फायदा घेत सापांच्या चावाच्या भीतीने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.शिवाय कब्रस्थानमध्ये असलेल्या अंधारामुळे दफनविधी साठी जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याविषयी पालिकेच्या कर्मचारी यांना वारंवार सांगितल्या नंतर स्ट्रीट लाईट उपलब्ध नसल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगितले जाते.येत्या तीन दिवसांत येथील कब्रस्थान मधील स्ट्रीट लाईट सुरू झाले नाही तर पालिकेसमोर उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.शिवाय जोपर्यंत कब्रस्थान व शहरातील बंद असलेले स्ट्रीट लाईट सुरू करण्याचे काम होणार नाही तोपर्यंत संबंधित ठेकेदाराचे बिल देवू नये असे पालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.निवेदन देतांना हाजी खलील शेख,वाजीद खाटीक, हाजी शेख अख्तर,मोहसीन शेख,आसिफ शेख आदी उपस्थित होते.हे निवेदन पालिकेच्या सहाय्यक कार्यालय निरीक्षक सौ संगीता बाक्षे यांनी स्वीकारले.

No comments