पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणपूर येथील रंगतरंग कार्यक्रमात चिमूरड्यांची धमाल! गणपूर (ता चोपडा) शेतकरी गीतावरण नृत्य करताना विद्...
पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणपूर येथील रंगतरंग कार्यक्रमात चिमूरड्यांची धमाल!
गणपूर (ता चोपडा) शेतकरी गीतावरण नृत्य करताना विद्यार्थी व विद्यार्थीनीं
गलंगी प्रतिनिधी मच्छिंद्र कोळी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
गणपूर (ता चोपडा) येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा रंगतरंग वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर थिरकत प्रेक्षकांची अक्षरशः मने जिंकली. टाळ्यांच्या गडगडाटात कार्यक्रम तीन तास चालला.
शिवाजी महाराजांचा पोवाडा, पाटलाचा बैलगाडा, लुंगी डान्स,आरती, गणेश वंदना, शेतकरी गीत, आदिवासी गीत,इत्यादी कलागुणांना वाव देणारी गाणी यावेळी पहिली ते चौथीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सादर केली. सुरुवातीला सरपंच भूषण गायकवाड, शालेय व्यवस्थापन समितीतील शिक्षण तज्ञ ऍड. बाळकृष्ण पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रोहिणी बेहेरे,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून द्वीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या विविध गीतांना सुरुवात झाली. सुंदर वेशभूषा, तालबद्धपणे गाणी सादर करत विद्यार्थ्यांनी प्रत्येक गीताला टाळ्या मिळवल्या. यावेळी केंद्रप्रमुख पुरूषोत्तम सोनवणे, मुख्याध्यापक संजीव पाटील, शाळेतील सर्व शिक्षक, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, पालक व शिक्षण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पारे व रमेश पाटील यांनी केले. उपस्थितांचे आभार किशोर पाटील यांनी मांडले.

No comments