चोपडा नगरात मुनिश्री प्रभातसागरजी यांचे सल्लेखना महाव्रत अन्न, पाणी त्यागाचा चौथा दिवस दर्शणार्थींचा ओघ चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेम...
चोपडा नगरात मुनिश्री प्रभातसागरजी यांचे सल्लेखना महाव्रत अन्न, पाणी त्यागाचा चौथा दिवस दर्शणार्थींचा ओघ
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दिगंबराचार्य मुनिश्री पवित्र सागर यांचे परम शिष्य प.पु. प्रभावसागरजी मुनीश्री आणि प.पु.प्रभातसागरजी मुनीश्री यांचे गेले वीस दिवसापासून नगरात वास्तव्य असून विशेष धर्मप्रभाना करीत आहे. प.पु. प्रभातसागरजी मुनीश्री यांचे पंचंद्रिय दिवसेंदिवस क्षीण होत आहे. हे लक्षात घेता त्यांनी सल्लेखना महाव्रत (संथरा) अंगीकारले असून २३ फेब्रुवारीपासून त्यांनी अन्नजलाचा त्याग केला आहे .हे महाव्रत धारण करून चारही प्रकारचे रस त्याग करून उत्कृष्ट समाधीसाठी वीरता के साथ पुढे सरसावत आहे. हा मृत्यू महोत्सव पाहण्यास व दर्शणार्थींची देशभरातील भाविक मोठ्या संख्येने जळगाव जिल्ह्यातील चोपडा नगरात होत असलेल्या महोत्सवास मोठ्या संख्येने पोहोचत आहेत .जैन धर्म वास्तवात जीवन जगण्याची कला शिकवतो मृत्यूच्या साक्षात्काराची कलाही शिकवत सल्लेखनापूर्वक उपवास करून देह त्याग करणे हे जन्माचे सार्थक आहे व जीवनाचे सार आहे . मुनीश्रींनी त्यागपूर्वक आत्मसमाधी मिळवण्यासाठी मोठ्या सहासाने मृत्यूला निमंत्रण दिले आहे. अशी माहिती खान्देश समाजाचे प्रसिद्धी प्रमुख खान्देश जैन पत्रकार सतीश वसंतीलाल जैन यांनी दिली आहे .सल्लेखनाधारी प.पु.प्रभातसागरजी मुनीश्रींना संबोधनासाठी निर्यापक प.पु. प्रभावसागरजी मुनिश्रीसह श्रावक श्राविका चोपडा जैन समाज विशेष परिश्रम घेत आहे. तसेच उपस्थित जैन समाज द्वारा महामंत्र पठण पाठण चालू आहे. तसेच चोपडा जैन समाज द्वारा येणा-या भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे .कुसुंबा ,धरणगाव ,दहिगाव चाळीसगाव ,धुळे, कापडणे, सोनगीर जळगाव ,पिंपळगाव हरेश्वर ,शेंदुर्णी, औरंगाबाद ,मालेगाव ,सटाणा आदी गावातून भाविकांची प्रतिदीन उपस्थिती लाभत आहे.
No comments