पाचोरा शहरातून १६ वर्षीय तरुणी बेपत्ता.अपहरण किंवा पळवून नेल्याचा संशय पोलिसांची तपास मोहीम सुरु. ( जळगांव प्रतिनिधी शेख जावीद) (संपादक -...
पाचोरा शहरातून १६ वर्षीय तरुणी बेपत्ता.अपहरण किंवा पळवून नेल्याचा संशय पोलिसांची तपास मोहीम सुरु.
( जळगांव प्रतिनिधी शेख जावीद)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पाचोरा- शहरातील एका भागात वास्तव्यास असलेली १६ वर्षीय तरुणी सकाळी पहाटे सुमारास अचानक घरातून बेपत्ता झाली असून तिचे अज्ञाताने अपहरण केले की फूस लावून बळजबरीने पळवून नेले अशी चर्चा आहे. सदर प्रकरणी तरुणीच्या वडीलांनी पाचोरा पोलिस ठाण्यात संशयित विरोधात गुन्हा नोंद केला असून पाचोरा पोलिस प्रशासनाच्या वतीने पोलिसांचे पथक बेपत्ता झालेल्या तरुणीचा शोध घेण्याचे काम युध्द पातळीवर करीत आहे.पोलिस सूत्रांच्या माहिती नुसार शहराच्या एका भागात राहणारी १६ वर्षीय इयत्ता १२वी ची परीक्षा देत असलेली पिडीत मुलगी ही दि.२५ फेब्रुवारी २०२५ मंगळवार रोजी घरातील सर्व सदस्य झोपलेले असतांनाच सकाळी पाच वाजेच्या सुमारास बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली सर्व सामान्य कुटुंबातील १६ वर्षीय अल्पवयीन पिडीत मुलीची इयत्ता बारावीची परीक्षा सुरु आहे ती रात्री नियमितपणे अभ्यास करुन झोपली होती सकाळी सहा वाजता मुलीची आई तिला उठवण्यासाठी गेली परंतु सदरील पिडीता तीच्या जागेवर दिसून आली नाही म्हणून घरातील इतर सदस्यांना जागे करुन पिडीतेचा आजू- बाजूला शोध घेतला ती घरात बाहेर कुठेही मिळुन न आल्याने तीचा आसपासच्या घरात व नातेवाईकांकडे शोध घेतला तेथेही तिचा सुगावा लागला नाही. घरच्यांनी बसस्थानक आणि रेल्वे स्टेशनसह संपूर्ण पाचोरा शहर परीसर पिंजून काढला मात्र सदरील पिडीता मिळून आली नाही. शेवटी आपल्या मुलीच्या अज्ञानतेचा फायदा घेत कुणीतरी अज्ञात व्यक्तीने तीला फुसलाऊन पळवून नेले असावे अशी दाट शक्यता असल्याची शंका आल्याने पिडीत मुलीच्या वडीलांनी पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात , संशयित विरोधात कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे . फिर्यादी वरुन पाचोरा पोलीसांनी तात्काळ शोध मोहीम सुरु करून तरुणी बेपत्ता झाल्याची माहिती राज्यातील सर्व पोलीस स्टेशनला कळविली आहे. फोटोतील सदर वर्णनाची तरुणी कुठेही आढळून आल्यास पाचोरा पोलीस स्टेशन किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये त्वरित माहिती द्यावी असे आवाहन मुलीचे वडील आणि पाचोरा पोलिसांनी केले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांचे मार्गदर्शनात सहा .पोलिस निरीक्षक चव्हाणके आणि पोलिस पथक करीत आहे पाचोरा शहर तालुक्यात मुली बेपत्ता व पळविण्याच्या प्रकारात वाढ पाचोरा तालुक्यातील व शहरात गेल्या काही वर्षांपासून रोडरोमिओ आणि टपोरीगिरी करणाऱ्या मुलांच्या संख्येत वाढ झाली आहे. अल्पवयीन मुली, विवाहित महिला यांना सोशल मीडियाच्याचा आधार घेऊन व आमिष दाखवून पळवून नेण्याचे गुन्हे पाचोरा पोलिसात दाखल केले जात आहे.रोडरोमिओ आणि बेकायदेशीर कॅफेंकडे पोलिसांचे दुर्लक्षपाचोरा शहरात भडगांवरोड भागात महाविद्यालय आणि शाळांची संख्या जास्त प्रमाणात असून भुयारी मार्गापासून सुरू होणारा हा भाग उच्चभ्रू म्हणून गणला जातो. या रोडवरून तरुणी, विद्यार्थिनी शाळा, कॉलेज मध्ये ये - जा करतात असे असतांना टपोरी रोडरोमिओ शाळा, कॉलेजला जाणाऱ्या मुलींच्या मागे लागतात, भरधाव दुचाकी वाहने चालवताना कर्कश हॉर्न वाजवितात. तसेच शहराच्या भडगावरोड भागात वाढत जाणारे बेकायदेशीर कॅफे मुला - मुलींचे संपर्काचे अड्डे झाल्याच्या चर्चा आहे. शाळा, कॉलेज परिसरात रोडरोमियोगिरी करणारे आणि बेकायदेशीर चालविले जाणारे कॅफे या कडे पोलिस अधिकाऱ्यांचे कोणत्या कारणास्तव दुर्लक्ष आहे यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
No comments