यावल तालुक्यात अवैध धंद्यांना सर्वत्र उधाण अवैध धंदे कधी होणार बंद ? शब्बीरखान यावल (प्रतिनिधी) :- (संपादक -:-हेमकांत गायकवाड) यावल तालुक...
यावल तालुक्यात अवैध धंद्यांना सर्वत्र उधाण अवैध धंदे कधी होणार बंद ?
शब्बीरखान यावल (प्रतिनिधी) :-
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
यावल तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासुन सर्व प्रकारच्या अवैधधंद्यांना ऊत आले असुन हाताला काम (मजुरी ) नसतांना आदीच सर्वसामान्य नागरिक आर्थीक संकटात सापडलेले असतांना शहरासह ग्रामीण भागात मोठया प्रमाणावर अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याने अनेकांचे कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर दिसत आहे.
दरम्यान यावल तालुक्यात सर्वत्र सट्टा मटक्याच्या पेढया सुरू असल्याने अनेक मजुरांनी आपल्या कामाकडे पाठ फिरवली आहे, तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवैधरित्या सार्वजनिक ठिकाणी बेकादेशीर देशी मद्य, हातभट्टीची घातक गावठी मद्याची विक्री होत असल्याने अल्पवयीन मुलही व्यसनाच्या आहारी जातांना दिसत आहे. याच बरोबर जिल्ह्यात सर्वत्र बंद असलेली कालबाह्य झालेल्या मिनिडोअर वाहनातून होणारी अवैध प्रवासी वाहतुक मुळे गरजु प्रवासांची आर्थिक लुट करुन अवा की सव्वा भाडे वसुल केले जात असुन, याशिवाय आसन क्षमते पेक्षा अधिक प्रवासी बसवुन अवैध प्रवासी वाहतुक करणारे मिनिडोअर चालकांकडुन ग्राहकांची आर्थिक लुट होत आहे .
विविध ठिकाणी जुगारीचे अड्डे सुरू असल्याने भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ होतांना दिसत आहे. सार्वजनिक ठिकाणी खुलेआम गुटखा विक्री होत असुन असा प्रकारच्या अवैधधंद्यांना सर्वत्र ऊधाण आले असून, अनेक दिवसांपासुन सर्व प्रकारचे उद्योग व्यवसाय बंद झाल्याने हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली असुन , त्या आर्थिक संकटातुन नागरिक बाहेर पडण्यासाठी प्रयत्नात असतांनाच यात तालुक्यात शहर परिसर व ग्रामीण क्षेत्रात अवैधधंद्यांनी धुमाकुळ माजवला असुन सहज मिळणाऱ्या दारू, सट्टा मटका या अवैध धंद्यायांच्या माध्यमातुन पैशांच्या प्रलोभनाला बळी पडुन अनेकांचे संसाराच्या राख रांगोळी होवुन त्यांचे संसार उद्धवस्त होवुन त्यांच्या कुटुंबावर उपासमारीचे प्रसंग ओढवु लागले आहे .पोलीस प्रशासनाने तात्काळ असा प्रकारच्या अवैधधंद्यांना वेळीच प्रतिबंध करणे नागरीकांच्या हिताचे असेल अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरीकांमध्ये व्यक्त होत आहे .
No comments