adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शहरात शिवजयंती उत्सव मिरवणुकीमध्ये कुख्यात गॅंगस्टर लॉरेन्स बिस्नोईचा फलक झळकविणाऱ्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  शहरात शिवजयंती उत्सव मिरवणुकीमध्ये कुख्यात गॅंगस्टर लॉरेन्स बिस्नोईचा फलक झळकविणाऱ्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  अहिल्यानग...

 शहरात शिवजयंती उत्सव मिरवणुकीमध्ये कुख्यात गॅंगस्टर लॉरेन्स बिस्नोईचा फलक झळकविणाऱ्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 


अहिल्यानगर (दि.२१ प्रतिनिधी):-

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर शहरातील शिवजंयती उत्सव मिरवणुकीमध्ये कुख्यात गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा फलक झळकविणाऱ्या तरुणा विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात आज अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दि.१९ फेब्रुवारी रोजी शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,इम्पेरिअल चौक ते दिल्लीगेट या मार्गे पैलवान प्रतिष्ठान माळीवाडा,छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती नालेगाव,जनता गॅरेज मित्र मंडळ सावेडी,साई संघर्ष युवा मंच सावेडी,शिवबा प्रतिष्ठान मल्हार चौक अहिल्यानगर या मंडळांनी सहभाग घेतला होता, मिरवणुक दरम्यान इसम नामे ओमकार बाळासाहेब धारुरकर (रा.सोनार गल्ली कर्जत जि. अहिल्यानगर) याने त्याचे हातामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार  लॉरेन्स बिन्त्रोई याचे पोस्टर झळकले या घटनेबाबत कोतवाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार राजेंद्र प्रभाकर गर्गे यांच्या फिर्यादीवरुन वरील तरुणा विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं १२०/२०२५ भारतीय नागरी संहिता कलम २२३ सह मुंबई पोलीस अधिनियम, ३७(१) (ड)/१३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन पुढील तपास मपोहेकॉ/निता अडसरे या करीत आहेत. (प्रताप दराडे) पोलीस निरीक्षक कोतवाली पो. स्टे, अहिल्यानगर

No comments