यावल येथील श्री गजानन महाराज प्रकट दिन मोठ्या उत्साहाने साजरा भाविकांना महाप्रसादाचे वाटप करताना माजी नगराध्यक्ष श्री अतुल पाटील जिल्हा पर...
 यावल येथील श्री गजानन महाराज प्रकट दिन मोठ्या उत्साहाने साजरा
भाविकांना महाप्रसादाचे वाटप करताना माजी नगराध्यक्ष श्री अतुल पाटील जिल्हा परिषद चे माजी गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे संस्थेचे अध्यक्ष श्री आर डी पाटील डॉ हेमंत येवले 
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल येथील विरार नगर भागातील असलेल्या श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त दिवसभर धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने संपन्न झाले. गण गण गणात बोते जय घोषाने संपूर्ण परिसर भक्तीमय झालेला होता यावेळेस स्त्री च्या पादुकांची पालखींची मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली सदरील पालखीचा समारोप विरार नगर येथील श्री गजानन महाराज मंदिरात करण्यात आला
यावेळेस येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकांना महाप्रसाद म्हणून पिठले व पोळीचे वाटप करण्यात आले यावेळेस शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ मोठ्या उत्साहाने घेतला व दुपारी बारा ते पाच याव नगरीचे माजी नगराध्यक्ष श्री अतुल पाटील माजी जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे संस्थेचे अध्यक्ष आर डी पाटील यांच्यासह उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले संस्थांचे अध्यक्ष श्री आर डी पाटील यावल नगरीचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील विश्वस्त पीएम जोशी अशोक भंडारी लक्ष्मण क्षीरसागर अनिल पाठक यांनी सहकार्य केले रात्री ह भ प राधा पाटील यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला या वेळेस यावल शहर व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते
No comments