आ. चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत धरती आबा जनजातीय उन्नत ग्राम अभियान योजना व आदिवासी विकास विभागांच्या विविध योजनांचे सादरीकरण...
आ. चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत धरती आबा जनजातीय उन्नत ग्राम अभियान योजना व आदिवासी विकास विभागांच्या विविध योजनांचे सादरीकरण बैठक संपन्न
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्याचे भाग्यविधाते कार्यसम्राट आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत धरती आबा जनजातीय उन्नत ग्राम अभियान योजना व आदिवासी विकास विभागांच्या विविध योजनांचे सादरीकरण जिल्हाअधिकारी आयुष प्रसाद साहेब व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित,प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या सोबत बैठक संपन्न
आदिवासी समाजाच्या विकासासाठी एक महत्वपूर्ण बैठक!
आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी यांनी विविध योजनांची सादरीकरण केली, ज्यामध्ये CFR Management Plan चा समावेश होता.
बैठकीला चोपडा आमदार चंद्रकांत सोनवणे,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांची उपस्थिती होती.
या योजनांमुळे आदिवासी समाजाच्या विकासासाठी चालना मिळेल!
आदिवासी बांधवांसाठी एकत्र येऊन काम करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे
बैठकीत घेण्यात आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी खालील प्रमुख विषय उपस्थित केले
१) तालुक्यातील प्रलंबित असलेले वाडी वस्ती पाडे पेसा अधिनियम पेसा गावाच्या दर्जा देऊन पाड्यांना पेसा अबंध निधी द्यावा
२)आदिवासी भागांना सर्व जल स्तोत्राची बळकटी करून पाणी पातळी वाढवणे
३)प्रलंबित वनदावे बाबत जिल्हाधिकारी मार्फत लवकर प्रकरण निकाली काढण्यात यावी
४)मंजूर असलेले वनगावी यांना पी एम किसान योजनेच्या लाभ देण्यात यावा
५)आदिवासी भागातील गाव पाडे यांना महसूल गाव घोषित करावे
६)पेसा गावांना अंगणवाडी व मिनी अंगणवाडी सुरू करण्यात यावी
७)आदिवासी पेसा गावांना गावठाण प्रस्ताव मंजूर करून देण्यात यावा
८)आदिवासी पाड्यांवरील घरकुल योजना पात्र लाभार्थी यांना त्यांचे भौतिक क्षेत्रातील नदी मधून रेती सहज उपलब्ध करून देण्यात यावी
९)पेसा गाव पाडे यांना जोडणारे सर्व रस्ते तयार करून देण्यात यावे
धरती आबा जनजातीय उन्नत ग्राम अभियान योजना व आदिवासी विभाग विविध योजना सादरीकरण
१)धरती आबा जना जाती है उन्नत ग्राम अभियान योजनेची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी
२)या योजनेत जळगाव जिल्ह्यातील १५ तालुक्यातून ११२ गावांचा समावेश आहे
३)आदिवासी समाज ज्या गावात किमान ५०० पेक्षा जास्त किंवा ५०% पेक्षा जास्त लोकसंख्या वास्तव्याला आहेत अशा प्रत्येक गावाचा व त्यातील प्रत्येक आदिवासी कुटुंबे व लाभार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनातुन लाभ देण्याबाबतची कार्यवाही ही नियोजनबद्ध रित्या पुढील पाच वर्षात शासकीय विभागांमार्फत हे सर्व लाभ देण्यात यावेत ४ सामुहिक वनहक्क मंजुर झालेले अशा २०५ गावांपैकी केंद्र शासनाच्या निदर्शनानुसार प्राथमिक स्वरूपात अनुसूचित क्षेत्रातील वीस गावांचे सामुहिक वनहक्क गावांचे (सी.एफ.आर. मॅनेजमेंट प्लॅन)आराखडे तयार केलेबाबत हडपे सहाय्यक वनसंरक्षक चोपडा यांनी सादरीकरण केले.याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित,जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे,प्रकल्प अधिकारी अरुण पवार,उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अकलाडे,सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपले,अजय पाटील,प्रा.प्रशांत सोनवणे क.ब.चौ.उ.म.वि.जळगाव,प्रशांत माहुरे सहाय्यक प्रकल्प अधिकारी यावल आदी उपस्थित होते.




No comments