हातेड खु!! ग्रामपंचायत इतिहासात पहिल्यांदा श्रीमती अनिता शिरसाठ यांच्या रूपाने दलीत समाजाला प्रतिनिधित्व देऊन गावाने पुरोगामित्व केले सिद्...
हातेड खु!! ग्रामपंचायत इतिहासात पहिल्यांदा श्रीमती अनिता शिरसाठ यांच्या रूपाने दलीत समाजाला प्रतिनिधित्व देऊन गावाने पुरोगामित्व केले सिद्ध
हातेड/चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
हातेड खु!! ग्रामपंचायत इतिहासात पहिल्यांदा श्रीमती अनिता शिरसाठ यांच्या रूपाने दलीत समाजाला प्रतिनिधित्व देऊन गावाने पुरोगामित्व सिद्ध केले.....
.... गावाचे पुरोगामित्व सांगून सिद्ध करता येत नाही,त्यासाठी प्रत्यक्ष कृती करणे आवश्यक असते,त्यासाठी हातेड कर ग्रामस्थानी गावातील अल्पसंख्य दलीत समाजाला उपसरपंच पदाची संधी श्रीमती अनिता शिरसाठ यांना देऊन ते सिद्ध केले.
त्यासाठी गावातील युवा उद्योजक राहुल सोनवणे यांच्या प्रयत्नाने ग्रामपंचायत मध्ये बरेच सदस्य बिन विरोध निवडले व आता त्यांच्याच मार्गदर्शनाने बहुसंख्यने असलेले मराठा,कोळी समाज बांधव यांनी त्यांची सूचना उचलून धरली यासाठी अमृत उगतराव बाविस्कार , सुनील बाविस्कर , भूषण बाविस्कर ,रमेश विठ्ठल सोनवणे , अनिल बबनराव सोनवणे , अनिल अमृतराव सोनवणे ,सुनील मुरलीधर कोळी , साहेबराव शिरसाठ , मंगल नाईक यांनी परिश्रम घेतले
No comments