adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूरच्या मसाका जवळील हिमांशू गॅरेजला भीषण आग

  फैजपूरच्या मसाका जवळील हिमांशू गॅरेजला भीषण आग ऑईल, पेट्रोल किंवा शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा  अंदाज, तीस लाखचा सामान जळून खाक नुकसानीच...

 फैजपूरच्या मसाका जवळील हिमांशू गॅरेजला भीषण आग

ऑईल, पेट्रोल किंवा शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा  अंदाज, तीस लाखचा सामान जळून खाक नुकसानीचा पंचनामात अंदाज


इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

 फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना जवळील जे टी महाजन इंजिनिअरिंग कॉलेजला लागून असलेल्या हिमांशू मोटर्स या गॅरेजला अचानक दि.२३ फेब्रुवारी च्या रात्री  आग लागली. त्या आगीमध्ये दुरुस्तीसाठी असलेल्या  वाहनांसह स्पेअर पार्ट व अन्य साहित्य जळून खाक झाले ऑईल अन पेट्रोलमुळे आगीने रौद्ररूप घेतल्याचा अंदाज लावला जात असून हिशोबाची सर्वच कागदपत्रे जळून गेली.त्यामुळे कोणतेही कागदपत्र शिल्लक नाही. 

             याबद्दल सविस्तर माहिती अशी की, दि.२३ फेब्रुवारी च्या रात्री   हिमांशू मोटर्सच्या बाहेर नेहमीप्रमाणे त्यांचा वॉचमन गॅरेजच्या बाहेरील  शेडमध्ये झोपलेला होता.मात्र अचानक रात्री साधारणपणे  ११.३० च्या पुढे  शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि त्याला जाग आली.त्यात गॅरेज मधील अद्यावत असलेली मशिनरी व सुधारण्यासाठी आलेल्या जुन्या मोटरसायकली व ऑईलचे  ड्रम व स्पेअर  पार्ट ,शेड तसेच अन्य साहित्य  सर्व जळून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीची माहिती मिळताच फैजपूर, सावदा, यावल येथील अग्निशमन बंब मागवण्यात आले.परंतु काही अंशी उशीर झाल्याने तोपर्यंत गॅरेज जळून खाक झाले होते. या आगीची तीव्रता एवढी होती की अग्निशामन दलाचे जवानांना दुरूनच आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत होते. तलाठी तेजस पाटील व फैजपूर पोलीस स्टेशनचे एपीआय रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी प्रसंगी उपस्थित होते. दरम्यान आमदार अमोल जावळे, शरद महाजन, नरेंद्र नारखेडे, अनिल लढे, नितीन चौधरी  यांनी भेटी दिल्या. आमदार अमोल जावळे यांनी आगीची पाहणी करताना देवेंद्र कोलते यांनी योग्य ती मदत मिळावी अशी अपेक्षा आमदार जावळे यांच्याकडे व्यक्त केली.आगीचे नक्की कारण समजू शकले नाही मात्र शॉर्ट सर्किट मुळे किंवा ऑईल पेट्रोल मुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

देवेंद्र प्रमोद कोलते यांनी दिलेल्या माहितीवरून आगीत झालेले नुकसान पुढील प्रमाणे-  १६ लाख रुपये किमतीच्या मोटरसायकली करता लागणारे स्पेअर पार्ट. तीन लाख रुपये किमतीचे विविध कंपनीच्या एकूण १३ मोटरसायकल जु.वा.कि.अं  रुपये चार लाख किमतीचे हायड्रोलिक मशीन, कार वॉशर, हायड्रोलिक रॅम्प,ऑटोमेशन गन, कॉम्प्युटर,बॅटरी चार्जर,फर्निचर, कॉम्प्रेसर असे जु.वा. कि.अं. तसेच सात लाख रुपये किमतीचे सर्विस सेंटर करता असलेले पत्र्याचे शेड व त्यामध्ये स्पेअर पार्ट ठेवण्याकरता असलेले रॅक जु.वा. कीं. अं. असे एकूण ३० लाख रुपये किमतीच्या नुकसानीचा अंदाज पंचनाम्यात व्यक्त करण्यात आला आहे. पंचनामा पोलीस कॉन्स्टेबल  देवेंद्र पाटील यांनी केला. 

 दहा कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न - हे गॅरेज न्हावी येथील देवेंद्र कोलते व सौ.निलीमा चौधरी यांच्या भागीदारीने सुरू होते. हे गॅरेज तीन तालुक्यांसाठी नामवंत होते. त्यामुळे येथे दुरुस्तीसाठी येणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी होत असे.तसेच कामासाठी येथे दहा कामगार कामावर होते. त्यांच्यासाठी रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

No comments