पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथील हातमजुरी करण्याची मुलगी पोलीस शिपाई जिद्द व चिकाटीच्या जोरावर मिळविले आहे यश. ...
पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथील हातमजुरी करण्याची मुलगी पोलीस शिपाई जिद्द व चिकाटीच्या जोरावर मिळविले आहे यश.
(जळगाव प्रतिनिधी शेख जावीद )
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथील जिद्द व चिकाटी अंगी बाळगुन मेहनतीच्या जोरावर तरुणीने यशाचा पल्ला गाठत थेट पोलिस शिपाई होण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले आहे. वडिल हातमजुरी तर भाऊ पुस्तकाच्या दुकानावर मजुरी करुन आपल्या परिवाराचा गाडा चालवित आहे. वडिलांची व भावाची मेहनत बघुन तरुणीने जिद्द व चिकाटीच्या जोरावर आपले ध्येय गाठत नायगाव पोलिस भरतीत उत्कृष्ट कामगिरी करत पोलिस शिपाई पदावर नियुक्त झाली आहे पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथील रहिवासी आबा कोळी हे दुसऱ्यांच्या शेतात हात मजुरी करुन पत्नी एक मुलगा एक मुलगी अशांचा उदरनिर्वाह चालवत आहेत या सोबतच आबा कोळी यांचा मुलगा पाचोरा येथे पुस्तकाच्या दुकानावर मजुरी करतो वडिल व भाऊ यांची मेहनत पाहुन निकीता आबा कोळी हिने लहान पणापासून पोलिस दलात भरती होण्याची जिद्द मनात ठेवली व त्या प्रमाणे निकिता ही तयारीला सुद्धा लागली. एम. एम. महाविद्यालयात शिक्षण घेत पहाटे सहा वाजता घरुन निघुन एम. एम. महाविद्यालयाच्या प्रांगणावर सलग दोन तास शारिरीक श्रम करुन लगेच महाविद्यालयात शिक्षण घेत निकीता कोळी हिचा नित्य नियम सुरु झाला. सन - २०२२ / २०२३ मध्ये नायगाव (मुंबई) येथे पोलिस शिपाई पदाची भरती निकिता हिने अटेंड करत या भरती प्रक्रियेत जिव पणाला लावुन मेहनतीच्या जोरावर यश संपादन केले. तिच्या या यशात पाचोरा येथील स्वराज कॅरीयर अकॅडमी चे संचालक स्वप्निल मराठे, जि. प. शाळा गोराडखेडा येथे त्यावेळी तेथे कर्तव्यावर असलेले शिक्षक रावसाहेब पाटील सुभाष देवरे, दिपक धनगर यांची मोलाचे मार्गदर्शन लाभले.या सोबतच ग्राऊंडवर सराव करतांना शुभम गायकवाड यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन लाभले. निकिता कोळी हिने मिळविलेल्या यशाबद्दल पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक पवार यांनी सत्कार करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी गोराडखेडा चे खुर्द सरपंच मनोज आप्पा उत्तमराव पाटील पत्रकार नंदकुमार शेलकर, प्रविण बोरसे, दिलीप परदेशी जावीद शेख उपस्थित होते.

No comments