पाचोरा येथील ज्वेलसे दुकानातील घरफोडीचा गुन्हा उघड करण्यात आले पाचोरा पोलिसांना यश.एक गुन्हेगार मुददेमाल हस्तगत आरोपी अटक. ...
पाचोरा येथील ज्वेलसे दुकानातील घरफोडीचा गुन्हा उघड करण्यात आले पाचोरा पोलिसांना यश.एक गुन्हेगार मुददेमाल हस्तगत आरोपी अटक.
(जळगाव प्रतिनिधी शेख जावीद )
(संपादक हेमकांत गायकवाड)
पाचोरा :- येथील ज्वेलर्स दुकानातील घरफोडीचा गुन्हा उघड करण्यात पाचोरा पोलीसांना यश १ कुख्यात गुन्हेगार अटक,गुन्हयातील मुददेमाल हस्तगत फरार आरोपी तांचा शोध सुरु.दिनांक ०२/०२/२०२५ रोजी मध्यरात्रीचे सुमारास कोणीतरी अज्ञात चोरटयांनी पाचोरा शहरातील सराफ गल्लीतील राहूल विश्वनाथ चव्हाण यांचे मालकीच्या पाटील ज्वेलर्स दुकानाचे चॅनल गेट तोडून दुकानात प्रवेश करुन दुकानातील सीसीटीव्ही कॅमे-याची तोडफोड करुन तेथील डीव्हीआर व दुकानातील ६८०००-०० रुपयांचे सोन्या चांदीचे दागीने घरफोडी करुन चोरुन नेले होते त्याबाबत राहून विश्वनाथ चव्हाण यांचे फिर्यादीवरुन पाचोरा पोलीस स्टेशनला गु.र.नं. ४९/२०२५ बीएनएस- २०२३ चे कलम ३०५,३३१ (४) अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडडी, मा.अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कवीता नेरकर,मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री धनंजय वेरुळे,यांचे मागदर्शनाखाली सुरु असतांना पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी विविध टिम तयार करुन पाचोरा पोलीसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवुन घटनास्थळी फिंगर प्रिंट तज्ञ, डॉगस्कॉडला पाचारण करुन आजुबाजु चे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक सफेद रंगाची बोलेरोतुन आरोपींनी येवुन गुन्हा करुन फरार झाल्याचे दिसुन येत होते याबाब तजिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनला सीसीटीव्ही फुटेज प्रसारीत करुन गुन्हयाची माहिती देवून अज्ञात आरोपीतांचा शोध घेत असतांना दिनांक ०२/०२/२०२५ रोजी धरणगाव पोलीस ठाणे हददीतुन एक बोलेरो वाहन चोरी झाल्याने धरणगाव पोलीस देखील अज्ञात आरोपीतांच्या मागावर असतांना दिनांक ०७/०२/२०२५ रोजी रामानंद नगरपोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीसांना त्यांचे हददी मध्येअज्ञात आरोपी गुन्हयातील चोरलेले वाहन सोडून पळतांना सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये कैद झाल्याचे दिसुन येत असल्याने त्या वर्णनावरुन तपास करीत असतांना त्यातील आरोपी रणजितसिंग जिवनसिंग जुन्नी रा. राजीव गांधी नगर, जळगाव हा असल्याची पक्की खात्री झाल्याने रामानंद नगर पोलीसांनी दिनांक ०८/०२/२०२५ रोजी रणजितसिंग जिवनसिंग जुन्नी यास सापळा रचुन त्यास राजीव गांधी नगर जळगाव येथुन ताब्यात घेवुन धरणगाव पोलीस ठाणे कडीलदाखल गुन्हा रजि. नं. ३१/२०२५ मध्ये सदरचे आरोपीतास अटक करण्यात येवुन गुन्हयातील बोलेरो कार क्रमांक एमएच-१९-ए एक्स-७०९८ जप्त करण्यात आली होती. सदर आरोपीता ने दिनांक ०४/०२/२०२५ रोजी खामगाव बुलढाणा येथे ए टी एम फोडुन ते सदर बोलेरो मध्ये घेवुन जाण्याचा प्रयत्न केला असल्याची कबुली दिली आहे म्हणुन सदर गुन्ह्याचा अभिलेख पडताळणी केली असता शिवाजी नगर पोलीस स्टेशन खामगाव गुरनं २१/२०२५ बी एन एस कलम ६२ प्रमाणे दाखल असल्याचे मिळुन आले असुन सदर आरोपीयाबाबत माहिती पाचोरा पोलीसांना समजताच पाचोरा पोलीसांनी तात्काळ धरणगाव येथे जावुन तेथील अटकेतील आरोपी रणजितसिंग जिवनसिंग जुन्नी रा. राजीव गांधी नगर, जळगाव यास पाचोरा पोलीस ठाणे कडील गुन्हयात वर्ग करण्यात येवुन आरोपी कडे गुन्हयाबाबत विचारपुस केली असता प्रथमतः आरोपीताने उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु त्यास अधिक विश्वासात घेवुन गुन्हयाबाबत सखोल चौकशी करता अटक आरोपीने गुन्हयाची कबुली देवुन सदरचा गुन्हा त्याचे साथीदार नामे १) हघुलसिंग ऊर्फ शक्तीसिंग जिवनसिंग जुन्नी रा. राजीवगांधी नगर, जळगाव २) सुबेरसिंग राजुसिंग टाक रा. मानवद परभणी ३) शेरुसिंग स्वजितसिंग बोंड रा.बोंड परभणी यांचे मदतीने केल्याचे व गुन्हयातील मुददेमाल जळगाव येथील सोनाराकडे गहाण ठेवले बाबत कबुली दिल्याने पोलीसांनी तात्काळ जळगाव येथे जावुन अटकेतील आरोपी नामे रणजितसिंग जिवनसिंग जुन्नीयाने समक्ष घरफोडी चोरीतील सोने चांदीचे वस्तुविकलेल्या सोनाराचे दुकान दाखवुन त्याचे कडुन गुन्हयातील गेला माल सोन्या चांदीची लगड एकुण कि.रु. ६७०८१-०० रुपये किमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात पाचोरा पोलीसांना यश आलेले आहेअटक आरोपी हा अटटल गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द आज पावेतो खालील प्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झालेले आहे.S.A.R.पोलीस स्टेशन G.R.No.आणि पेन १.)मलकापुर पोलीस स्टेशनभाग-5 GURNO 51/2016 IPC. ४५७ ३८०2.मलकापुर पोलीस स्टेशन भाग-5 GURNO 64/2016 IPC. ४५७,३८०3.)रामानंद नगर पोलीस स्टेशनभाग-6 गुरनं 109/2016 भा.द.वि. 143,147,148 वगैरे4.)रामानंद नगर पोलीस स्टेशन भाग-6 शासन क्रमांक 40/2018 आर्म ऍक्ट 4/25५.)रामानंद नगर पोलीस स्टेशन भाग-5 गुर क्रमांक 38/2021 IPC. ३९५, आर्म ॲक्ट ४/२५ 6.)जिल्हापेठ पोलीस स्टेशन भाग-5 गुरनो 299/2021 IPC.395,७.)रामानंद नगर पोलीस स्टेशन भाग-6 जी. क्रमांक 08/2023 142 एमपीओचा 8.)रामानंद नगर पोलीस स्टेशन MPO चा भाग-6 GUR क्रमांक73/2023 142९.)रामानंद नगर पोलीस स्टेशन भाग-6 जी. क्रमांक 97/2023 142 MPO, Orm कायदा 4/25
10.)रामानंद नगर पोलीस स्टेशन भाग-5 गुरान 160/2024 IPC 11.)शनिपेठ पोलीस स्टेशन भाग-5 गुरान 166/2024 IPC
12.)एरंडोल पोलीस स्टेशन भाग-5 गुरनो 230/2024 IPC 303(2)13 शिवाजी नगर पोलीस स्टेशन खामगाव भाग-5 गुरनं 21/2025 भा.न्या सं कलम 62 सदरची कारवाई ही मा. पोलीस निरीक्षक अशोक पवार यांचे मागदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सोपान गोरे पोहवा/राहूल शिंपी, सहा. पोलीस उप निरीक्षक रणजित पाटील, पोकॉ योगेश पाटील, पोकों/सागर पाटील, चापोकों/मजिदखान पठाण यांचे पथकाने केली आहे अटक आरोपी सध्या पोलीस कोठडी रिमांड मध्ये असुन अटक आरोपीताने त्याचे साथीदारांचे मदतीने अशाच प्रकारचे गुन्हे यापुर्वी केल्याची शक्यता असुन त्यादृष्टीने पाचोरा पोलीस पुढील तपास करीत असुन घर फोडीचा गुन्हा उघउकीस आणुन उत्कृष्ट कामगिरी केल्याबददल मा.पोलीस अधीक्षक जळगाव यांनी तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.

No comments