adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन यांची दमदार कामगिरी पुणे जिल्ह्यातील चार आरोपींकडुन ०१ गावठी बनावट्टी कट्टा (पिस्टल) व २ जिवंत काडतुस सह जेरबंद

  चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन यांची दमदार कामगिरी  पुणे जिल्ह्यातील चार आरोपींकडुन ०१ गावठी बनावट्टी कट्टा (पिस्टल) व २ जिवंत काडतुस सह जेरबं...

 चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन यांची दमदार कामगिरी 

पुणे जिल्ह्यातील चार आरोपींकडुन ०१ गावठी बनावट्टी कट्टा (पिस्टल) व २ जिवंत काडतुस सह जेरबंद


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक  कावेरी कमलाकर यांना गुप्तबातमीद्वारा मार्फत बातमी मिळाली की दिनांक ०९/०२/२०२५ रोजी १६.३० वाजता हातेड ता चोपडा शिवारातील बुधगांव जाणारे फाटा रोडवर ४ इसम हे गावठी कट्टा (पिस्टल) हे घेवुन जात आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने मा.पो.नि कावेरी कमलाकर सो यांनी पोकॉ/ रावसाहेब पाटील, पोकॉ/ चेतन महाजन, पोकॉ/ विठ्ठल पाटील, पोकॉ/ विशाल पाटील, पोकॉ/ प्रमोद पारधी अशांना माहिती देवून सदर कारवाई करणे बाबत आदेश केले होते तेव्हा सदर कारवाई करीता बुधगांव फाटा याठिकाणी सापळा रचुन त्याठिकाणी मिळालेल्या माहितीनुसार ०४ इसम हे सदर ठिकाणी थांबल्याचे दिसुन आले त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव नामे ०१) वैभव शैलेश गायकवाड वय २४ रा केशवनगर रेणुकामाता मंदिर समोर मुडवा-३६ ता हवेली जि.पुणे. ०२) सुजल प्रकाश गायकवाड वय २१ वर्षे रा सर्वोदय कॉलनी प्रकाश किराणा दुकानाचे मागे मुडवा-३६ ता हवेली जि.पुणे ०३) सौरभ सुनिल जाधव वय २१ वर्षे मुळ रा सर्वोदय कॉलनी ता हवेली जि.पुणे ह.मु. साईनाथ नगर सारथी स्कुल जवळ वडगांव शेरी ता हवेली जि. पुणे ०४) स्वयं पिंटु रॉय वय २१ वर्षे रा सर्वोदय कॉलनी पोस्ट आँफिसच्या मागे भोईराज सोसायटी या आरोपींजवळ बेकायदेशी रित्या विना परवाना एक बनावटी गावठी कट्टा (पिस्टल), ०२ जिवंत काडतुस व ४ मोबाईल असा एकुण ४९,०००/-रु किमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे सदर आरोपी विरुध्द पोकॉ/ विठ्ठल पाटील यांनी फिर्याद दिल्यावरुन गुन्हा चोपडा ग्रामीण सी.सी.टी.एन.एस गुरंन ०१९/२०२५ भारतीय हत्यार कायदा ३/२५,७/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यांचा तपास पोनि कावेरी कमलाकर व पोकॉ/ विनोद पवार हे करीत आहे

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक सो महेश्वर रेड्डी, मा अप्पर पोलीस अधिक्षक सो चाळीसगांव परिमंडळ मा उपविभागीय पोलीस अधिकारी सो चोपडा आण्णासाहेब घोलप यांचे मार्गदर्शनखाली पोनि कावेरी कमलाकर सो यांनी पोकॉ/ रावसाहेब पाटील, पोकॉ/ चेतन महाजन, पोकॉ/ विठ्ठल पाटील, पोकॉ/ विशाल पाटील, पोकॉ/ प्रमोद पारधी अशांनी केली आहे

No comments