छत्रपती शिवरायांचे गुण आत्मसात करणे काळाची गरज- राहुल पाटील. कुरवेल येथे शिवजयंती निमित्त व्याख्यान चोपडा प्रतिनिधी (संपादक-:- हेमकांत ग...
छत्रपती शिवरायांचे गुण आत्मसात करणे काळाची गरज- राहुल पाटील.
कुरवेल येथे शिवजयंती निमित्त व्याख्यान
चोपडा प्रतिनिधी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी कुरवेल तालुका चोपडा येथे स्वराज्य गृप तर्फे राहुल पाटील सरांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यात युवकांना मार्गदर्शन करताना राहुल पाटील सर म्हणाले की, जिजाऊ मासाहेबांनी शिवरायांना स्वराज्याचे बाळकडू तर पाजलेच पण त्याचबरोबर उत्तम संस्कारही केले.
पुढे ते म्हणाले की, शिवरायांनी दीनदलितांचे,कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे, बहुजनांचे स्वराज्य निर्माण केलं, परंतु स्वतःला कधी स्वराज्याचे मालक समजले नाही. या स्वराज्यात प्रत्येक माणूस हा राजा म्हणून वावरला पाहिजे ही शिवरायांचे धारणा होती. स्वराज्याच्या कार्यात शिवरायांभोवती जी निष्ठावंत मावळ्यांची मांदियाळी गोळा झाली त्यांची स्वराज्याच्या कार्यात मोलाची साथ लाभली.
छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे राजे नव्हते तर खऱ्या अर्थाने स्वराज्याचे प्रेरणास्त्रोत होते कारण त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक स्वतंत्र राज्य हिंदुस्थानात उदयास आली. यावेळी गावातील स्वराज्य ग्रुपचे सर्व सदस्य तसेच गावातील सर्व माता-भगिनी व गावकरी उपस्थित होते.

No comments