ट्रक चालकाचा खून करून पळून जाणाऱ्या आरोपींना सिनेस्टाईल पाठलाग करत नगर तालुका पोलिसांनी ठोकल्या बेड्या अहिल्यानगर (दि.१२):- (संपादक-:- ह...
ट्रक चालकाचा खून करून पळून जाणाऱ्या आरोपींना सिनेस्टाईल पाठलाग करत नगर तालुका पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अहिल्यानगर (दि.१२):-
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
नगर तालुक्यातील नारायणडोह शिवारामध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने ट्रक चालकास चाकूने वार करत जीवे ठार मारून पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या आरोपींचा नगर तालुका पोलिसांनी सिने स्टाईल अर्धा तास पाठलाग करून जेरबंद करण्याची कामगिरी केली आहे. याबाबत माहिती अशी की दि.११ फेब्रुवारी रोजी ओसवाल इम्पेरियल चव्हाण व साहेबा आनंद गायकवाड दोघे रा. वाळुंज पारगाव (ता.जि. अहिल्यानगर) यांनी वाळुंज बायपास रोड वरून कंटेनर घेऊन कुरण वस्ती नारायण डोर या ठिकाणी लाईटचे केबल पोल व इलेक्ट्रिक बोलला धडक देऊन नुकसान केले व तसेच एक जखमी व्यक्ती रोडच्या बाजूला पडलेला आहे अशी माहिती नगर तालुका पोलीस स्टेशनचे सपोनी. प्रल्हाद गीते यांना मिळाली, मिळालेल्या माहितीनुसार नगर तालुका पोलीस सदर ठिकाणी गेले या ठिकाणी गेल्यानंतर नवनाथ मुरलीधर जायभाय यांच्याकडून समजले की ट्रक चालकास वरील दोघांनी चाकूने भोकसले व ते पसार झाले आहे. सदरील आरोपी हे कुरण वस्ती कडे जाणाऱ्या रेल्वे पटरीने पळालेले आजी माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ रेल्वे पटरी कडे जाऊन दोन ते अडीच किलोमीटर पाठलाग करून आरोपींना पकडले. आरोपींच्या कपड्यांवर रक्ताचे डाग दिसून आले व कंटेनर ची चावी खिशात मिळून आली त्यांना कंटेनर कोठे आहे असे विचारले असता त्यांनी कंटेनर हा ब्रिज खाली उभा केला आहे व सदरील गुन्हा केल्याची कबुली दिली. नगर तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनी.प्रल्हाद गीते करीत आहे. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेशोला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलिस अधिकारी नगर ग्रामीण विभाग संपतराव भोसले यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते पोलीस उपनिरीक्षक पतंगे सहाय्यक फौजदार रमेश गांगर्डे पोलीस हेडकॉन्स्टेबल झावरे पोलीस कॉन्स्टेबल बांगर पोलीस कॉन्स्टेबल अन्सार शेख पोलीस कॉन्स्टेबल राजू खेडकर यांनी केली आहे.

No comments