adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

एक दिवस महाराजांसाठी आयोजित तालुकास्तरीय शिवछत्रपती अभिवाचन स्पर्धा...

  एक दिवस महाराजांसाठी आयोजित तालुकास्तरीय शिवछत्रपती अभिवाचन स्पर्धा... भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल तालुक्...

 एक दिवस महाराजांसाठी आयोजित तालुकास्तरीय शिवछत्रपती अभिवाचन स्पर्धा...


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल तालुक्यात तहसीलदार मोहनमाला नाजीरकर मॅडम, गटशिक्षणाधिकारी श्री विश्वनाथ धनके साहेब व डॉ श्री नरेंद्र महाले सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच आयोजित तालुकास्तरीय अभिवाचन स्पर्धेमध्ये यावल तालुक्यातील तब्बल २२१ विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदवला... दिनांक १८ फेब्रुवारी रोजी जे टी महाजन इंग्लिश मीडियम स्कूल यावल येथे ही स्पर्धा घेण्यात आली


त्या स्पर्धेतून २५ विद्यार्थ्यांची दोन गटांमध्ये निवड करून त्यांचे १९ फेब्रुवारी शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित राजे निंबाळकर किल्ल्यावर सादरीकरण मोठा उत्साहात झाले.. विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.. सोबतच सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.. यावेळी तहसीलदार मोहनमाला नाजीरकर मॅडम यांनी केलेल्या शिवगर्जने चे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.. डॉ. नरेंद्र महाले सर यांनी केलेल्या शिवव्याख्यान  ने एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली.. भाग्यश्री चौधरी यांनी सादर केलेली शिवकन्या एकांकिका ने सर्वांचे डोळे पाणावले... स्पर्धेची पर्यवेक्षक म्हणून पंढरीनाथ महाले सर दिलीप पाटील सर, तेजस्विनी कोलते मॅडम, लोखंडे मॅडम व सूत्रसंचालन श्री नितीन बारी सर यांनी केले.. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ नरेंद्र महाले सर व सहसमन्वयक म्हणून दीपक वारुळकर यांनी काम पाहिले...

 एक दिवस महाराजांसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ अभय रावते,प्राचीताई पाठक,धीरज भोळे,दीपक वारुळकर,निलेश पाटील, सोहम बारी,गोलू बारी,शुभम कोळी, मोहित वारुळकर, उमाकांत बारी, भाग्यश्री चौधरी,मोहिनी फेगडे,सत्यजित बारी,विशाल भोई, त्यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

No comments