adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वनविभागात मध्ये झालेल्या पेसा भरतीत बोगस वनरक्षकांच्या विरोधात लवकरच पुरावे सादर करून उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आदिवासी वकील बांधव

  वनविभागात मध्ये झालेल्या पेसा भरतीत बोगस वनरक्षकांच्या  विरोधात लवकरच  पुरावे सादर करून उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आदिवासी वकील बां...

 वनविभागात मध्ये झालेल्या पेसा भरतीत बोगस वनरक्षकांच्या  विरोधात लवकरच 

पुरावे सादर करून उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आदिवासी वकील बांधव


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

वनविभागात सन २०१६ - १७ व २०२४ मध्ये पेसा क्षेत्रात वनरक्षक म्हणून निवड झालेले काही बाहेरून आलेले परप्रांतीय (मध्य प्रदेश) सण २०२४ मधील एकूण १ ते २० तसेच सण २०१६-१७ भरतीत निवड झालेले उमेदवार यांच्या विरोधात लवकरच उच्च न्यायालयात याचिका(पिटीशन) दाखल करणार असे स्थानिक आदिवासी वकील एडव्होकेट जामसिंग बारेला,चोपडा कोर्ट,एडव्होकेट वसंत पावरा चोपडा कोर्ट,एडव्होकेट युवराज बारेला व सामाजिक कार्यकर्ते मिळून लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारअसे समाज माध्यमाच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल असे प्रतिपादन केले व त्या साठी जळगाव जिल्ह्यातील,चोपडा,यावल,रावेर,या अनुसूचित जमाती क्षेत्रात स्थानिक उमेदवार यांना संधी असताना बेकायदेशीर पणे परप्रांतीय(मध्य प्रदेश)मधील उमेदवार यांनी योजनेच्या नावाने व पैशांची लालच दाखवून स्थानिक आदिवासी समान नावाच्या व्यक्तीची मुळ कागदपत्रे उदा फॉरेस्ट नोंदी १९५० पूर्वीचे, जातीचा दाखला,जात वैधता प्रमाणपत्र,शाळेचा दाखला,जन्म दाखला,मतदान कार्ड,अधिवास प्रमाणपत्र,पेसा दाखला आधार कार्ड इत्यादी महत्त्वाचे कागदपत्रे मिळवून सदर वनविभागात बेकायदेशीर पणे भरती निवड झाली आहे.सदरची बेकायदेशीर भरतीत प्रक्रियेत सामील अधिकारी व वनरक्षक यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून आदिवासी वकिल बांधव यांनी धुळे वनविभागातुन महत्वाचे पुरावे हाती आले व तसेच चोपडा,यावल,रावेर येथे पाठपुरावा करून लवकरच माहिती संकलित करून लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती एडव्होकेट जामसिंग बारेला व एडव्होकेट वसंत पावरा,एडव्होकेट युवराज बारेला यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले आहे

No comments