तब्बल २१ वर्षांनंतर प्रभात विद्यालय हिंगोणा विद्यालयातिल माजी विद्यार्थी एकत्र माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न... यावल (प...
तब्बल २१ वर्षांनंतर प्रभात विद्यालय हिंगोणा विद्यालयातिल माजी विद्यार्थी एकत्र
माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न...
यावल (प्रतिनिधी)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल( दि.१६) गेल्या २१ वर्षानंतर हिंगोणा येथिल प्रभात विद्यालयतील २००२ / २००३ या शैक्षणिक वर्षातील १० वि बॅचच्या विदयार्थी व विद्यार्थांनी यांचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा ( गेट टूगेदर) नुकताच उत्साहात संपन्न करण्यात आला सदरील माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी तब्बल २१ वर्षानंतर एकत्र आले तर २००३ या वर्षातिल माजी विद्यार्थी विद्यार्थीनींही या कार्यक्रमाला एकत्र आले. तरी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेतील माजी मुख्याध्यापक सदानंद पाटील (सदू सर) हे होते शाळेत माजी शिक्षकांचे गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी इय्यत्ता१० वीची २००२ /२००३ची बॅच एकत्र आल्याने सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले तसेच शाळेतील माजी विद्यार्थी यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत आपापली मनोगत व्यक्त केली. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक मनोज गाजरें, धांडे सर, फिरके सर, एस सी पाटील, मंगला मैडम, फालक सर, झांबरे सर, तसेच विद्यार्थी निलेश बोरणारे, राहुल झांबरे, निलेश निंबाळे, सचिन गाजरे, लिना जावळे, पुनम कोल्हे, सुनेशा भोळे, सचिन गाजरे, देवानंद तायडे, शब्बीर खान, विलास भालेराव, गिरीष गाजरे आदी विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते.

No comments