रोहिणीच्या डी.आर.कुंभार विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न "गुणवत्ता वाढीसाठी सर्वांनी प्रयत्नशील राहा" - संस्थेचे...
रोहिणीच्या डी.आर.कुंभार विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
"गुणवत्ता वाढीसाठी सर्वांनी प्रयत्नशील राहा" - संस्थेचे सचिव नानासाहेब निशांतजी रंधे
प्रतिनिधी वसिम खाटीक शिरपूर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
रोहिणी ता. शिरपूर-येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार माध्यमिक विद्यालयात किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव, नानासाहेब निशांतजी रंधे यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.
समारंभात आधी देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या पुतळ्यास धुळे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती कैलासभाऊ पावरा व शिरपूर पंचायत समिती सदस्य बागल्या दादा पावरा यांनी तर हरित क्रांतीचे जनक वसंतरावजी नाईक यांच्या पुतळ्यास शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बन्सिलाल भाऊ बंजारा व भाजपा सांगवी विभाग प्रमुख पिंटूभाऊ बंजारा यांनी माल्यार्पण केले. संस्थेचे संस्थापक, माजी अध्यक्ष, थोर स्वातंत्र्य सेनानी कर्मवीर अण्णासाहेब व्यंकटरावजी रणधीर, लोकमाता सावित्रिताई रंधे, संस्थेचे माजी सचिव दादासाहेब विश्वासरावजी रंधे, संस्थेचे माजी खजिनदार, माजी प्राचार्य, डाॅ. विजयरावजी रंधे व माजी विश्वस्त लिलाताईजी रंधे यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
समारंभात शिरपूर काॅटेज हाॅस्पिटल अधिक्षक डाॅ. सुनिल पावरा, भोईटी सरपंच दिपक भाऊ पावरा, रोहिणी उपसरपंच वसंत भाऊ पावरा, वनपाल शितल माळी, केंद्र प्रमुख राजेश राठोड, माजी मुख्याध्यापक के. डी. चौधरी, सामाजिक कार्यकर्ते शिवानंद चव्हाण, भिकन बुवा, फत्तेसिंग कारभारी, प्राथमिक शाळा नवापाडाचे मुख्याध्यापक पंकज ठाकरे, प्राथमिक शिक्षक सोनवणे यांचेसह पालक उपस्थित होते.
आदर्श विद्यार्थी महेंद्र भील, मागील वर्षी इयत्ता दहावीत प्रथम आलेल्या किर्ती पवार व शिवानी बंजारा यांचेसह वर्षभरातील विविध स्पर्धा उपक्रमांमध्ये यशस्वी झालेल्या सेमी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.
प्रास्ताविकात विद्यालयातील विविध उपक्रमांबद्दल मुख्याध्यापक प्रल्हाद द. सोनार यांनी माहिती दिली. सूत्रसंचालन विजय बागुल, योगेश गुरव व हिंमतराव शिरसाठ यांनी तर आभार प्रदर्शन नितिन शिंदे यांनी केले. उपशिक्षिका वर्षा पाटील, वरिष्ठ लिपिक अंबादास सगरे, उपशिक्षक रोहिदास पावरा, रत्नाकर सुर्यवंशी, राकेश डुडवे, सुनिल राठोड, भूषण भोई, उपशिक्षिका मिरा सुळे, भारती पवार, रिना जाधव, शिपाई संजय वाघ, गणपत शिरसाठ, संजय तिरमले व राहूल खैरनार यांनी समारंभासाठी परिश्रम घेतले.
No comments