श्री साई इंग्लिश मिडीयम स्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्सवात साजरा मच्छिंद्र कोळी गलंगी प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) श्री साई इ...
श्री साई इंग्लिश मिडीयम स्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्सवात साजरा
मच्छिंद्र कोळी गलंगी प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
श्री साई इंग्लिश मिडीयम स्कूल गलंगी येथे दरवर्षाप्रमाणे यावर्षीही 17 फेब्रुवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन 'रंग उधळण' चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी चंद्रशेखर युवराज पाटिल, उपस्थित होते तसेच अनेर पंचक्रोशितील सरपंच, पोलीस पाटील ,सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते,संस्थेचे अध्यक्ष आबासो.श्री कांतिलाल अभिमन पाटिल,उपाध्यक्ष दादासो.श्री गोकूळ अभिमान पाटिल अजंतीसिम चे पोलिस पाटील ताईसो.स्नेहलता पाटील, उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात फोटो पुजन व व्दिपप्रज्वलन करुन करण्यात आले. कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक श्री उमेश रामकृष्ण महाजन यांनी शाळेचा वार्षिक अहवाल वाचून दाखवला, संस्थेचे अध्यक्ष आबासो.श्री कांतिलाल अभिमन पाटिल यांनी शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी भविष्यात योजले जाणार्या योजनंचा परामर्श दिला तसेच आजपर्यंत पालकांनी शाळेवर/संस्थेवर दर्शविलेला विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले. रंग उधळण कार्यक्रमात नर्सरी ,ज्यु.के.जी,सिनी.के.जी च्या चिमुकल्यांनी व इ.1ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांनी विविध धार्मिक, पौराणिक,आधुनिक,ऐतिहासिक प्रसंगांच्या गीतांवर नृत्य सादर केले. एकंदरीत कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक श्री उमेश महाजन, पर्यवेक्षक श्री दिपक सोनवणे,श्री. छोटू सोनार,श्री. विनोद पाटील, सुवर्णा देशमुख, यमुना बाविस्कर, मोनाली महाजन, स्वाती बोरसे,दिपाली शिरसाठ, श्रध्दा सैंदाणे व शिक्षकेतर कर्मचारी,पालकवर्ग यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.


No comments