यावल महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी भरत कोळी प्रतिनिधी (यावल) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल येथील कला, वाणिज्य व विज्...
यावल महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
भरत कोळी प्रतिनिधी (यावल)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे व उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली छ. शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
विद्यार्थिनी भाग्यश्री भोई हिने महाराजांवर भाषण केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. अमोल भालेराव(उपशिक्षक सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम शाळा यावल) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की छ. शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होऊन गेले राजमाता जिजाऊ,वडील सेनापती शहाजीराजे भोसले यांच्या संस्कारशील वातावरणात कुशाग्र बुद्धिमत्ता निर्माण झाली. गडकिल्ल्यांचे अचूक ज्ञान, पर्यावरण, कृषी संस्कृती, समुद्रातील आरमार जहाज, स्त्रियांचा सन्मान, मावळ्यातील गनिमी कावा, पन्नास वर्षाच्या आयुष्यात एकूण सात गडकिल्ले जिंकले ही त्यांची कामगिरी, युद्ध करण्याची पद्धती ह्या संदर्भात विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुधीर कापडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज हे अठरा जनतेचे राजे होते, ज्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले, वयाचे तेराव्या व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला, रयतेच्या कल्याणासाठी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले, समाजात थोर व्यक्तींचा हात जोडून(नमस्कार) शिष्टाचार करण्याची पद्धती अशी संस्कारशील पद्धत महाराजांनी जोपासली याचा आजही सन्मान होत आहे. जागतिक स्तरावर आदर्शाचे महाराजांचे स्थान आहे. असे सांगितले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात शिवाजी महाराज जयंती निमित्त निबंध लेखन स्पर्धा पार पडली त्यात वैभवी पाटील प्रथम (प्रथम वर्ष कला),दिव्या पाटील (प्रथम वर्ष कला) रोहित नलावडे तृतीय (तृतीय वर्ष कला) हे क्रमांकाचे मानकरी ठरले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुभाष कामडी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संतोष जाधव यांनी केले तर आभार प्रा. रामेश्वर निंबाळकर यांनी मानले.
यावेळी कार्यक्रमाला महाविद्यालयाचे कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. संजय पाटील, डॉ. हेमंत भंगाळे, डॉ. आर डी पवार, प्रा. मनोज पाटील उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. निर्मला पवार, डॉ. वैशाली कोष्टी, प्रा नरेंद्र पाटील, प्रा. प्रतिभा रावते,प्रा.भावना बारी, प्रा. हेमंत पाटील, प्रा. प्रशांत मोरे, मिलिंद बोरघडे, संतोष ठाकूर, दुर्गादास चौधरी, प्रमोद भोईटे, प्रमोद कदम, दशरथ पाटील, रमेश साठे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.

No comments