adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रतिकात्मक कुऱ्हाड मोर्चासाठी आझाद मैदानावर बुलडाणा जिल्ह्यातील हजारोच्या संख्येने कोळी जमात बांधवांनी सहभागी व्हा..... गणेश इंगळे यांचे आव्हान

  प्रतिकात्मक कुऱ्हाड मोर्चासाठी आझाद मैदानावर बुलडाणा जिल्ह्यातील हजारोच्या संख्येने कोळी जमात बांधवांनी सहभागी व्हा..... गणेश इंगळे यांचे ...

 प्रतिकात्मक कुऱ्हाड मोर्चासाठी आझाद मैदानावर बुलडाणा जिल्ह्यातील हजारोच्या संख्येने कोळी जमात बांधवांनी सहभागी व्हा..... गणेश इंगळे यांचे आव्हान



अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

बुलडाणा:- महाराष्ट्रातील गोरगरीब आदिवासी कोळी महादेव,कोळी टोकरे,कोळी मल्हार,कोळी ढोर जमात बांधवांवर महाराष्ट्रातील आदिवासी क्षेत्राबाहेरील जमात प्रमाणपत्र देणारे प्रांताधिकारी व अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी करणाऱ्या समित्यांच्या मनमानी कारभारामुळे त्रासलेले आहेत. गेल्या ४० वर्षांपासून न्याय हक्कांसाठी लोकशाही मार्गाने लढा सुरू आहे. अनुसूचित क्षेत्रातील बांधवांच्या प्रमाणे १९५० पूर्वीच्या कोळी नोंदीचा रहिवास पुरावा ग्राह्य धरून विनाअट जमात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र प्रांताधिकारी व पडताळणी समितीने द्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी ३ मार्च २०२५ रोजी आझाद मैदान, मुंबई येथे सौ.गीतांजली ताई कोळी यांच्या नेतृत्वात जमात बांधव समवेत भव्य प्रतिकात्मक कुऱ्हाड मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे.गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीवर जो अन्याय होत आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि आमचे हक्क आमच्या अधिकार आमच्या पदरात पाडून घेण्यासाठी या मोर्चाचे आयोजन केलेले आहे प्रशासन आमच्या न्याय हक्काची दखल जो पर्यंत घेत नाही तो पर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही अशी ठाम भूमिका जमातीची राहणार असून या कुऱ्हाड मोर्च्यात बुलढाणा जिल्ह्यातील युवक,कर्मचारी,माता बंधू-भगिनी या मोर्चासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान कोळी जमातीचे गणेश इंगळे यांनी केले.

No comments