नवी मुंबई येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट(जे एन पी टी) येथे जहाज नामकरण समारंभास केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे उपस्थिती... मुंबई/ जळगाव प्...
नवी मुंबई येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट(जे एन पी टी) येथे जहाज नामकरण समारंभास केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे उपस्थिती...
मुंबई/ जळगाव प्रतिनिधी -:-
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नवी मुंबई येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट येथे मर्स्क कंपनीच्या वतीने आयोजित जहाज नामकरण समारंभास केंद्रीय मंत्री बंदर,जहाजबांधणी आणि जलमार्ग श्री सरबनंदा सोनवाल यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांना उपस्थित राहण्याचा सन्मान मिळाला.
नवनिर्मित हे जहाज भारताच्या सागरी पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यास आणि देशाची मालवाहतूक क्षमता वाढवण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.केंद्रीय मंत्री बंदर,जहाजबांधणी आणि जलमार्ग सरबनंदा सोनवाल यांच्या नेतृत्वाखाली अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत लॉजिस्टिक्सच्या वचनबद्धतेसह, हे जहाज भारताला जागतिक व्यापार केंद्र बनवण्याच्या दृष्टीकोनाला आणखी चालना देईल.
भारताची बंदरे ही आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत आणि अशा प्रगत सुविधा केवळ व्यापार वाढवणार नाहीत,तर नव्या रोजगाराच्या संधी देखील निर्माण करतील.यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील विकसित भारत @2047 या संकल्पनेला अधिक बळ मिळेल.
No comments