adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पाल हरीण पैदास केंद्रातील प्राण्यांच्या मृत्यु प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आमदार अमोल जावळे यांना वन्यजीव प्रेमींनी दिले निवेदन

  पाल हरीण पैदास केंद्रातील प्राण्यांच्या मृत्यु प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी    आमदार अमोल जावळे यांना वन्यजीव प्रेमींनी दिले निवे...

 पाल हरीण पैदास केंद्रातील प्राण्यांच्या मृत्यु प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी

   आमदार अमोल जावळे यांना वन्यजीव प्रेमींनी दिले निवेदन    


 रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 रावेर तालुक्यातील पाल येथील हरिण  पैदास केंद्रातील हरिन मृत्यु  प्रकरणी  शासकीय  चौकशी  करून  दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी  या हरिण पैदास केंद्राला केंद्रीय झू ऑथोरिटी ची मान्यता मिळवून पुनर्जीवित करण्याची मागणी करत निवेदन दिले आहे. यात मागील आठवड्यात  यात सातत्याने   कधी २ तर कधी  ४ अशा प्रकारे एका आठवड्यात १४ प्राणी मृत झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून याला जबाबदार कोण असा प्रश्न वन्यजीवप्रेमीं मध्ये निर्माण  झाला असून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे येत्या  विधानसभा अधिवेशनात हरिण पैदास केंद्राचे प्रश्न मांडून वरीष्ठ पातळीवर चौकशी करावी अशी मागणी करत सदर हरिण पैदास केंद्र ३५ ते ४० वर्षांपासून सुरू असून तेथील  हरिण विविध प्रजातीसह २९ च्या संख्येने काही वर्षांपूर्वी होते त्यातून ६/७  प्राणी केंद्रात होरफळत आहे हरिण पैदास केंद्राला प्राण्यांची देखभाल संगोपन होत नसून त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून याकडे कोणत्याही वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नसून वन विभागाला कुठलीही माहिती विचारली असता उडवाउडवी चे उत्तर मिळत असतात. त्याच धर्तीवर लाखों रुपये खर्चून काही दिवसांपूर्वी जंगल सफारी सुरू करण्यात आली आहे मात्र हरीण पैदास केंद्राला अनुदानित करण्यासाठी कोणीही पुढाकार घेतला नाही. याच हरीण पैदास केंद्राला 1998 मध्ये  झु अथोरिटी ची परवानगी मिळाल्यास केंद्र सरकारकडूनही या केंद्राला निधी मिळू शकला असता मात्र त्यासाठी वन विभागाला काही अटी पूर्ण करण्यास झु ऍथॉरिटी ऑफ इंडिया ने सांगितल्या होत्या मात्र आज पावतो कुठलेही उपायोजना त्यावर करण्यात आली नाही मध्यंतरी काळात हरिण पैदास केंद्रातील प्राण्यांना पुन्हा जंगलात मुक्तअधिवासात सोडण्याचा थाट रचला होता तो पण अयशस्वी राहिला 

२०२१ मध्ये वन विभागाच्या वैद्यकीय चाचणीमध्ये त्यांना मुक्तअधिवासात न  सोडण्याचा निर्णय  घेतला होता विभागाच्या उदासिन ते मुळे वन्यजीवांचे झालेले मृत्यू हे गंभीर स्वरूपाची बाब असून या संपूर्ण प्रकरणाची शासकीय चौकशी होऊन आज पावतो हरिण मृत्यू प्रकरणाची शासकीय चौकशी होऊन प्राण्यांच्या संगोपनाच्या कामात कसूर केलेल्या कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अश्या आशयाचे निवेदन आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांना  खिर्डी ता. रावेर येथील वन्यजीव प्रेमी संकेत पाटील ,अंकित पाटील, भागवत महाजन ,यज्ञेश भंगाळे यांनी सावदा येथे भेट घेऊन निवेदन दिले आहे.

आमदार अमोल जावळे यांनी सदर पैदास केंद्रातील मृत प्राण्यांच्या प्रकरणाची चौकशी करत असून दोषींवर लवकरच निलंबनाची कारवाई करण्यात येईल व हरिण पैदास केंद्रासाठी उपाययोजना करण्यात येतील अशी माहिती दिली.

प्रतिक्रिया 

हरीण पैदास केंद्राला  प्रधान मुख्यवनसंरक्षक वन्यजीव यांनी भेट देणे गरजेचे आहे . वरिष्ठ अधिकारी अधिकारी याकडे जाणून दुर्लक्ष करीत आहे.  हरिण पैदास केंद्राची उच्चस्तरीय चौकशी होऊन मृत झालेल्या प्राण्यांना न्याय मिळावा व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. या बाबत आमदार अमोल जावळे व अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव मुंबई यांना  निवेदन देण्यात आले आहे. 

संकेत पाटील, खिर्डी ता रावेर वन्यजीव प्रेमी

No comments