नागरिकांना डायल 112 प्रमाणेच क्युआर कोड द्वारे ही तक्रार दाखल करता येईल - सपोनि विशाल पाटील रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक-:- हेमक...
नागरिकांना डायल 112 प्रमाणेच क्युआर कोड द्वारे ही तक्रार दाखल करता येईल - सपोनि विशाल पाटील
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र शासनाने मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून 100 दिवसाच्या 7 कलमी कार्यक्रमांतर्गतही सदर उपक्रम राबविले जाणार आहे नागरिकांनी पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल करण्यासाठी 112 नंबर डायल वर संबंधितांना तक्रार करता येत होती त्याच प्रमाणे..आता पोलीस प्रशासनाने क्युआर कोड आपल्या मोबाईल मध्ये स्कॅन करून संबंधितांना आपली तक्रार दाखल करता येईल ही तक्रार जिल्हा पोलीस प्रशासनाला प्राप्त होऊन ती संबंधित पोलीस स्टेशन ला पाठविण्यात येणार असून तक्रारी ची तातडीने दखल जसे 112नंबर लावल्या वर पोलीस कर्मचारी तात्काळ दखल होऊन तक्रार दाराची दखल घेतात व समस्या जाणून घेत निसरन करीत तक्रारदाराला समाधान मिळते त्याच धर्तीवर मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसाच्या 7 कलमी कार्यक्रमांतर्गतही सदर संकल्पना राबविण्यात येणार आहे जळगांव जिल्हा पोलीस प्रशासनाने हे क्युआर कोड शासकीय निमशासकीय कार्यालये येथे सर्व सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आली असल्याचे एका कार्यक्रमाप्रसंगी सावदा पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी सांगितले

No comments