प्रकाश विद्यालय ज्युनिअर कॉलेज मध्ये वक्तृत्व स्पर्धा संपन्न रावेर तालुका प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) मोठा वाघोदा त...
प्रकाश विद्यालय ज्युनिअर कॉलेज मध्ये वक्तृत्व स्पर्धा संपन्न
रावेर तालुका प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
मोठा वाघोदा तालुका रावेर येथील चक्रधर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्रकाश विद्यालय ज्युनिअर कॉलेज मध्ये दिनांक १फेब्रुवारी २०२५ या दिवशी संस्थेचे संस्थापक चेअरमन कै. तोताराम गणू पाटील यांचे स्मरणार्थ वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक, आदरणीय व्ही. एस. महाजनसर, पर्यवेक्षक, आदरणीय, आर.पी. बडगुजर सर, व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या सभेचे अध्यक्षस्थानी प्रकाश विद्यालयाचे पर्यवेक्षक राजेश बडगुजर सर यांनी भूषविले. स्पर्धा ४ गटात घेण्यात आली. वयोगटानुसार व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास लक्ष्यात घेऊनच स्पर्धेचे विषय ठरवून नियोजन करण्यात आलेले होते. स्पर्धेचे सूत्रसंचलन श्रीमती. जयश्री पाटील मॅडम यांनी केले. स्पर्धेचे परीक्षक, श्री. ललित पाटील सर, अमित शिरसाठ सर, व सौ. आरती पाटील मॅडम हे होते. संकलित निकाल सौ. भावना पाटील मॅडम यांनी तयार केला. त्यानंतर स्पर्धेतील विजेते विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्यात आली. आभार श्री. अंकुश पाटील सर यांनी केले. अशाप्रकारे वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.

No comments