स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई २१ गोवंशीय जनावरांना दिले जीवदान सचिन मोकळं अहिल्यानगर :- (संपादक -:-हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर (दि.२ फ...
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई २१ गोवंशीय जनावरांना दिले जीवदान
सचिन मोकळं अहिल्यानगर :-
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.२ फेब्रुवारी):-कत्तलीसाठी डांबुन ठेवलेल्या ६ लाख ४५,०००/-रुपये किमतीच्या २१ गोवंशीय जनावरांची कर्जत येथुन सुटका करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री. दिनेश आहेर यांना जिल्हयातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. नमुद दिलेल्या आदेशान्वये पोनि/श्री. आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयावर कारवाई करणेबाबत सुचना देऊन पथकास रवाना केले. पथक दि.०१ फेब्रुवारी रोजी कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयाची माहिती घेत असताना पथकास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार येसवडी गांवेचे शिवारात प्रमोद भानुदास साळवे याचे शेतामधील पत्र्याचे शेडमध्ये छापा टाकला असता सदर ठिकाणी ४,५५,०००/- रुपये किमतीचे एकुण १३ गोवंशीय जिवंत जनावरे महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यास मनाई असतांना त्यांना कत्तल करण्याचे उद्देशाने आणुन विना चारापाण्याचे व निर्दयतने दाटीवाटीने त्रास होईल अशा रितीने डांबुन ठेवल्याचे आढळुन आले. सदर जनावराबाबत अधिक माहिती घेता सदरची जनावरे ही १)इरफान कुरेशी (फरार), २) प्रमोद भानुदास साळवे (फरार),बबलु कुरेशी (फरार) सर्व रा.राशीन, ता.कर्जत यांनी कत्तल करण्यासाठी आणले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.त्यानंतर वरील पथकाने मिळालेल्या माहितीनुसार इसम नामे वसीम कुरेशी याचे राशीन येथील कुरेशी मोहल्ल्यामध्ये छापा टाकला असता सदर ठिकाणी इसम नामे वसीम ख्वाजा कुरेशी वय ३५ वर्षे, रा. कुरेशी मोहल्ला, राशिन, ता. कर्जत,जि. अहिल्यानगर हा मिळुन आला असुन त्याचे ताब्यामध्ये १,९०,०००/- रुपये किमतीचे ८ जिवंत गोवंशीय जनावरे महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यास मनाई असतांना त्यांना कत्तल करण्याचे उद्देशाने आणुन विना चारापाण्याचे व निर्दयतने दाटीवाटीने त्रास होईल अशा रितीने डांबुन ठेवल्याचे आढळुन आले.
वरील दोन्ही कारवाईमध्ये एकुण ६,४५,०००/- रुपये किमतीचे २१ जिवंत गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली असुन इसम नामे १) इरफान कुरेशी (फरार), २) प्रमोद भानुदास साळवे (फरार), बबलु कुरेशी (फरार) सर्व रा. राशीन, ता.कर्जत यांचेविरुध्द कर्जत पोलीस ठाणे गु.र.नं. 62/2025 महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम कलम 5 (अ), 5 (ब), 9 सह प्राण्यांना निदर्यतेने वागविणेचे कलम 3,11 प्रमाणे व इसम नामे वसीम ख्वाजा कुरेशी वय 35 वर्षे,रा.कुरेशी मोहल्ला, राशिन, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर याचे विरुध्द कर्जत पोलीस ठाणे गु.र.नं. 62/2025 महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम कलम 5 (अ), 5 (ब), 9 सह प्राण्यांना निदर्यतेने वागविणेचे कलम 3, 11 प्रमाणे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरची कारवाई श्री.राकेश ओला, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री.विवेकानंद वाखारे उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार विश्वास बेरड,बापुसाहेब फोलाणे,गणेश भिंगारदे, पंकज व्यवहारे,राहुल सोळुंके,भाऊसाहेब काळे,जालींदर माने, महादेव भांड यांनी केलेली आहे.

No comments