जे.टी. महाजन इंग्लिश स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक-:- हेमकांत गायकवाड) आज दि .२८/२/२०२५ शुक्र...
जे.टी. महाजन इंग्लिश स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
आज दि .२८/२/२०२५ शुक्रवार रोजी यावल येथिल व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी. महाजन इंग्लिश स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रसंगी अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचर्या श्रीमती. रजंना महाजन मॅम व प्राचार्या श्रीमती. दिपाली धांडे मॅम उपस्थीत होते, तसेच विज्ञान तन्द शिक्षक डॉ. नरेंद्र महाले सर यांनी सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली
शाळेच्या शिक्षिका सोलेहा खान यांनी कार्यक्रमाची सुत्रसंचालन केले. तसेच अश्विनी चौधरी मॅम व प्रेरणा भंगाळे मॅम यांनी राष्ट्रीय विज्ञान दिवसाबद्दल मुलांना माहिती दिली तसेच डॉ नरेंद्र महाले सर यांनी विज्ञान दिवस बद्दल मुलांना मार्गदर्शन केले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.
No comments