adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पाचोऱ्यात बाहेरपुरा येथील तरूणाचा चाकुने खून.पाचोरा पोलीसांनी केली आरोपीस अटक तीन दिवसाची न्यायालय कस्टडी.

  पाचोऱ्यात बाहेरपुरा येथील  तरूणाचा चाकुने खून.पाचोरा पोलीसांनी केली आरोपीस अटक तीन दिवसाची न्यायालय कस्टडी.         (पाचोरा प्रतिनिधी :- श...

 पाचोऱ्यात बाहेरपुरा येथील  तरूणाचा चाकुने खून.पाचोरा पोलीसांनी केली आरोपीस अटक तीन दिवसाची न्यायालय कस्टडी.


     
 

(पाचोरा प्रतिनिधी :- शेख जावीद) 

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)

पाचोरा शहरातील येथे धक्कादायक घटना घडली आहे किरकोळ कारणावरून २० वर्षीय तरुणावर चाकुने वार करत खुन केल्याची घटना पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागात मध्यरात्री १२:३० वाजता घडली. घटनेतील मारेकऱ्यास पाचोरा पोलिसांनी जेरबंद केले आहे या घटनेप्रकरणी मारेकऱ्याविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे मिळालेल्या माहिती नुसार,१८ रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन शिव जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती १२ वाजुन १५मिनिटांनी मिरवणूक संपल्यानंतर हेमंत संजय सोनवणे (वय २०, रा. जुना माहेजी नाका,महात्मा फुले नगर, पाचोरा) येथील शहरातील बाहेरपुरा येथे रोहित गजानन लोणारी (वय २०, रा. शिव कॉलनी, पाचोरा) याने किरकोळ कारणावरून धारदार चाकूने पोटात वार करुन घटना स्थळावरुन पसार झाला.दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अशोक पवार व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल होवुन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या हेमंत सोनवणे यास तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले हेमंत सोनवणे हा गंभीर जखमी असल्याने त्यास जळगाव येथे उपचारार्थ हलविण्यात आले. तर हेमंत सोनवणे याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.रोहीत लोणारी यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये रोहित लोणारी यांच्या विरुध्द खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असुन घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार हे करीत आहे.

No comments