चौगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन मच्छिंद्र कोळी गलंगी ता चोपडा :- (संपादक -:- हेमका...
चौगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन
मच्छिंद्र कोळी गलंगी ता चोपडा :-
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा:- तालुक्यातील चौगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
माजी आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करण्यात आले.त्याचप्रमाणे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन चोपडा येथील इंडियन रेडक्रॉस सोसायटी व चौगाव येथील संभाजी ब्रिगेड, आदिशक्ती नवदुर्गा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी साखर कारखान्याचे माजी चेअरमन ॲड घनश्याम आण्णा पाटील,चोपडा पंचायत समितीचे माजी सदस्य अनिल पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी व्हॉईस चेअरमन नंदलाल पाटील,माजी पंचायत समिती सदस्य बापूराव पाटील, डॉ सोहम पाटील, राजेंद्र पाटील, सतीश कोळी, सरपंच, उपसरपंच, व सर्व ग्राम पंचायत सदस्य, ग्रामसेवक, तलाठी यांच्यासह गावातील मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते


No comments