चिवास सार्वजनिक वाचनालयात शिवजयंती साजरी शब्बीर खान यावल (संपादक-:- हेमकांत गायकवाड) यावल येथील चिवास सार्वजनिक वाचनालयात श्री छत्रपती शिव...
चिवास सार्वजनिक वाचनालयात शिवजयंती साजरी
शब्बीर खान यावल
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
यावल येथील चिवास सार्वजनिक वाचनालयात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरवातीस यावल येथील न.पा. सेवानिवृत्त व वाचनालयाचे कायम, नियमित वाचक श्री निळकंठ यादव यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करून करण्यात आली.यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष जगदीश कवडीवाले यांनी प्रास्ताविक करून, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पूजन करून अभिवादन आपले विचार मांडून सर्व वाचकाना श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्यात.यावेळी वाचनालयाचे वाचक भैय्या भोईटे, राजेश वाघ,राजेश यावलकर,दिनेश वाणी, ध्न्यानेश्वर सोनोवणे,शिंपी व इतर अनेक वाचक उपस्थित होते. कार्यक्रम चे नियोजन ग्रंथपाल हर्षल गजरुषी यांनी केले.

No comments