adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भिंगार येथे दंतेश्वरी महिला मंडळ अध्यक्ष वैशाली नागपूरे यांची गळफास घेऊन आत्महत्या बदनामी करून आत्महत्येस केले प्रवृत्त, भिंगार कॅम्प मध्ये गुन्हा दाखल

  भिंगार येथे दंतेश्वरी महिला मंडळ अध्यक्ष वैशाली नागपूरे यांची गळफास घेऊन आत्महत्या  बदनामी करून आत्महत्येस केले प्रवृत्त, भिंगार कॅम्प मध्...

 भिंगार येथे दंतेश्वरी महिला मंडळ अध्यक्ष वैशाली नागपूरे यांची गळफास घेऊन आत्महत्या 

बदनामी करून आत्महत्येस केले प्रवृत्त, भिंगार कॅम्प मध्ये गुन्हा दाखल 



अहिल्यानगर प्रतिनिधी : 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

भिंगार येथील दंतेश्वरी महिला मंडळाचे अध्यक्षा वैशाली सुनील नागपूरे या महिलेची बदनामी करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा संदर्भात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत महिलेचे पती सुनील नागपुरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भिंगार कॅम्प येथे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      अहिल्यानगरमधील भिंगार शहरात वसंत पंचमी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शोभायात्रा काढण्यावरून समाजातील दोन गटात मतभेद निर्माण झाला होता. तसेच वसंत पंचमीच्या निमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीनिमित्ताने समाजातील महिलांच्या सामूहिक फोटोंचे शुभेच्छा फलक लावण्यात आले होते. या फलकावरील मयत महिलेच्या फोटोला अज्ञात इसमाने काळे फासले होते. त्यामुळे मयत महिला या अपमानित झालेने तसेच आरोपी भूषण शिवलकर याने मयत महिलेची बदनामीकारक मजकूर प्रसारीत केल्याने महिलेने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक माहिती मिळाली.

मयत महिलेचे पती सुनील नागपुरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, भिंगार येथे वसंत पंचमी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये दंतेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्ष वैशाली नागपुरे यांनी समाजाची मिरवणुकी सायंकाळी आयोजित केले होते मिरवणुकीत समाजाचे काही नागरिकांनी विरोध केला मिरवणुकी दुपारी काढण्यात यावी यामधून समाजाच्या दोन्ही गटांमध्ये मतभेद होऊ लागले. परंतु त्यानंतर वैशाली नागपुरे व समाजातील स्त्रीयांचे दिनांक २/२/२०२५ रोजी वसंत पंचमी निमित्त् काढण्यात येणा-या मिरवणुकीत भिंगार गावात पेास्टर लावलेले होते. त्यावेळी तीचे बॅनरवरील पोस्टरला कोणीतरी काळे फासले होते. त्यामुळे वैशाली नागपुरे अपमानित झालेली होती. तसेच १) भुषण अतुल शिवलेकर याने मला व माझा मुलगा आकाश यांचे मोबाईल वर तुझी आई दिवस रात्र माझेसी फोनवर बोलती व माझे सोबत आहे असा मेसेज केला होता व सदर बाबत शिवलेकर कुटुंबातील २) अतुल दिगंबर शिवलेकर, ३) मयुर अतुल शिवलेकर, ४) कविता भुषण शिवलेकर रा. नायकु नगर भिंगार ५) शोभा बाळकृष्ण शिवलेकर, ६) संदिप बाळकृष्ण शिवलेकर ७) शितल संदिप शिवलेकर सर्व रा. सौरभ नगर भिंगार ता. जि. अहिल्यानगर या सर्व लोकांनी वैशाली हिचे भूषण, अतुल शिवलेकर यांचे बरोबर अनैतिक संबंध आहेत असे म्हणुन तीचा आमच्या समाजात वाईट प्रचार केला व तीची बदनामी करुन तीचा चारचौघात अपमान केला हे सर्व माझे पत्नीस सहन झाले नाही. या कारणावरुन ती ने गळफास घेतला आहे. तीचे आत्महत्याला वरील सर्वजण जबाबदार आहे. तसंच वैशाली नागपुरे यांनी गळफास घेतल्यानंतर त्यांच्या पतीला त्यांची चिट्ठी सापडली आहे. त्यामध्ये लिहिलेले आहे की, माझे विरुद्ध सर्व कट रचला गेला आहे. त्यांनी माझे फोटो देखील या वर्षभरात एडिट करून ठेवले असावेत मला पूर्णपणे संपवायचा प्रयत्न ही शिवलेकर कुटुंब करीत आहे. माझ्या आत्महत्यास अतुल शिवलेकर व त्याचे दोन मुलं तसेच सून आणि बायको हे शिवलेकर कुटुंबीय  सर्वजण जबाबदार आहे. आजची लिहिताना मला देखील थरथराट होत आहे. मला इतका मानसिक त्रास झाला आहे की मी त्यातच सहन करू शकत नाही असे त्या चिठ्ठीत लिहिलेले आहे असे फिर्यादीत म्हटले आहे. कॅम्प पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार १०८,४९,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॅम्प पोलीस पुढील तपास करीत आहेत.

No comments