विवरे बुद्रुक येथे जि प उर्दू शाळेत शाळा व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड. रावेर तालुका प्रतिनिधि मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड...
विवरे बुद्रुक येथे जि प उर्दू शाळेत शाळा व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड.
रावेर तालुका प्रतिनिधि मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील विवरे बुद्रुक येथे जि प उर्दू शाळा विवरे बुद्रुकच्या सर्व पालकांची सभा दिनांक ११ रोजी शाळेत शाळा व्यवस्थापन समिती ची निवड करणे संदर्भात पार पडली. सभेत विवरे गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य शेख शकील शेख शफी व सामाजिक कार्यकर्ते शेख जसीब उर्फ मोटी यांच्या विनंतीनुसार इयत्ता पहिली ते सातवीच्या वर्गातील पालकांनी संमतीने सदस्यांची बिनविरोध निवड केली. त्यानंतर सदस्यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून आदिल खान आमिन खान वशं नंबर ंंनौऔ उपाध्यक्ष शेख असलम शेख सिराज यांची बिनविरोध निवड जाहीर केली. शिक्षण तज्ञ म्हणून फिरोज खान समद खान यांना सर्वांच्या संमतीने समितीवर घेण्यात आले. या निवडीबद्दल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी माननीय विलास दादा कोळी, केंद्रप्रमुख रईस सर यांनी अभिनंदन व्यक्त केले.
No comments