साकळी येथे पुरातन जागृत श्री वाड़ेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रि निमित्त दोन दिवसीय महाउत्सवपर्व भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -...
साकळी येथे पुरातन जागृत श्री वाड़ेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रि निमित्त दोन दिवसीय महाउत्सवपर्व
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
साकळी ता.यावल - येथील मनवेल रस्त्यावरील पुरातन जागृत श्री वाड़ेश्वर महादेव मंदिरात सालाबादा प्रमाणे ह्या वर्षीही महाशिवरात्रिनिमित्ताने दोन दिवसीय महा-उत्सववाचे महापर्व आयोजित करण्यात आलेले आहे. या उत्सवात दि.२६ रोजी प्रातःकाल ५:४५ ला श्रृंगार दर्शन,
महाअभिषेक व आरती तसेच दुपारी १२ वाजेला चंदनलेप दर्शन व आरती,दुपारी ४ वाजेला आरती तसेच पाच ब्राह्मणांच्या हस्ते लघुरुद्र अभिषेक व ६ वाजेला सायंकालीन आरती आणि सम्पूर्ण दिवसभर दोन क्विंटल फराळाचे तसेच ६ क्विंटल केळीचे वाटप होणार आहे. शिवरात्र जागवण्यासाठी रात्री अविरत नामस्मरण केले जाणार आहे.दुसऱ्या दिवशी दि.२७ रोजी महाप्रसाद वाटपाच्या नियोजनाप्रमाणे सकाळी ८ वाजेपासुन पासून ते १वाजेपर्यत महाप्रसादाचे भोजन होणार आहे.साकळी गावासह पंचक्रोशीतील भाविक- भक्त महाप्रसादाचा लाभ घेत असतात. त्यात अनेक भाविकांच्या सढळ दानातून सात क्विंटल बट्टी व चार क्विंटल वांग्याची भाजी,वरण-भात,शिरा असा महाप्रसाद असणार आहे.दोन दिवस मंदिरात भाविक- भक्तांची मांदियाळी असणार असून हजारो भक्त महादेवाचे दर्शन घेणार आहे.या मंदिरात पुरातन असे शिवलिंग असून पूर्वेला अष्टविनायक पैकी एक महागणपती स्थापित करण्यात आलेला आहे.उत्सवानिमित्त मंदिरास आकर्षक सजावट करण्यात येत असते. गेल्या मागील काळात या मंदिराचा भाविक भक्तांच्या अथक सहकार्यातून जिर्णोध्दार करण्यात आलेला असून सुंदर व रेखीव मंदिर साकारण्यात आलेले आहे.मंदिर परिसरात विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आलेले आहे.त्यामुळे येत्या काळात मंदिर परिसरात सुंदरता निर्माण होणार आहे.या उत्सवानिमित्त मंदिर परिसरात धार्मिकतेचे व भक्तीभावाचे वातावरण निर्माण होणार आहे.
No comments