adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

उज्जैनकर फाउंडेशन तर्फे मुक्ताईनगर तालुक्यात ११ शाळांमध्ये ओळख श्री ज्ञानेश्वरी प्रचार आणि प्रसार उत्साहात

  उज्जैनकर फाउंडेशन तर्फे मुक्ताईनगर तालुक्यात ११ शाळांमध्ये ओळख श्री ज्ञानेश्वरी प्रचार आणि प्रसार उत्साहात  इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:-...

 उज्जैनकर फाउंडेशन तर्फे मुक्ताईनगर तालुक्यात ११ शाळांमध्ये ओळख श्री ज्ञानेश्वरी प्रचार आणि प्रसार उत्साहात 


इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

श्री क्षेत्र ज्ञानेश्वर महाराज संस्थान व श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती आळंदी देवाची आणि शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच मुक्ताईनगर तालुक्यातील ५ वी ते ८ वीपर्यंतच्या ११ शाळेमध्ये ओळख श्री ज्ञानेश्वरी, हरिपाठ, पसायदान याविषयी नुकताच प्रचार आणि प्रसार करण्यात आला याप्रसंगी श्री ज्ञानेश्वर चरित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश काळे श्री ज्ञानेश्वर संस्थान आळंदीचे ट्रस्टी श्रीधर सरनाईक श्री विलास वाघमारे श्री तुकाराम गवारी श्री विकास शिवले श्री अर्जुन मैदनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला याप्रसंगी उपक्रमाचे मुख्य प्रचारक श्री ज्ञानेश्वर चरित्र समितीचे अध्यक्ष श्री प्रकाश काळे यांनी विद्यार्थ्यांना ओळख श्री ज्ञानेश्वरी याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जीवनमूल्य रुजावेत त्यांच्यातील नैराश्य नाहीसे व्हावे यासाठी हा उपक्रम असल्याचे श्री काळे म्हणाले तसेच ज्ञानेश्वरी हा धर्मग्रंथ नसून जीवन ग्रंथ असल्याचे व आपल्या जीवनामध्ये संस्कार निर्माण करण्याचा हा महान ग्रंथ असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले याप्रसंगी श्री प्रकाश काळे यांनी सर्व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक बंधूं भगिनींना कडकडीची विनंती केली की, आठवड्यातून एक दिवस पसायदान आणि ओळख श्री ज्ञानेश्वरी, हरिपाठ याविषयी विद्यार्थ्यांना उद्बोधन व्हावे ही मोबाइल व संगणकाच्या युगात काळाची गरज असल्याचे ते प्रसंगी म्हणाले. सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रसंगी डॉ  शिवचरण उज्जैनकर यांनी प्रास्ताविकामध्ये या उपक्रमाची गरज काय याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या दोन दिवसीय उपक्रमामध्ये नवीन माध्यमिक विद्यालय, सुकळी या शाळेमधून प्रारंभ करण्यात आला त्यानंतर शिवाजी हायस्कूल कु-हा काकोडा स्वर्गीय अशोक फडके माध्यमिक विद्यालय कु-हा काकोडा नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी श्री शिवाजी हायस्कूल, वडोदा तसेच जे. ई. स्कूल मुक्ताईनगर, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल, मुक्ताईनगर श्री एस.  बी.  चौधरी विद्यालय, चांगदेव डॉ. जगदीश दादा पाटील इंग्लिश मीडियम स्कूल ,मुक्ताईनगर संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालय, मुक्ताईनगर आदी विद्यालयांमध्ये हा उपक्रम मोठ्या उत्साहात व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या मोठ्या उपस्थितीत संपन्न झाला. आदिशक्ती संत मुक्ताई जुने मंदिर व नवे मंदिर येथे मान्यवरांनी दर्शन घेऊन या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला तर योगी चांगदेव महाराज यांचे दर्शन घेऊन या उपक्रमाची सांगता करण्यात आली हा उपक्रम मुक्ताईनगर तालुक्यामध्ये सर्वप्रथम शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या माध्यमातून   आयोजित केल्याबद्दल आदिशक्ती संत मुक्ताई संस्थांचे अध्यक्ष माननीय एडवोकेट रवींद्र भैय्या पाटील मुक्ताई संस्थांचे ह.भ.प. रवींद्र हरणे महाराज ह. भ. प. उद्धव जुनारे महाराज माजी सभापती श्री निवृत्तीभाऊ पाटील डॉ. जगदीश दादा पाटील आदी मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत करून डॉ. शिवचरण उज्जैनकर यांचे मनापासून अभिनंदन केले. फाउंडेशनचे कार्यकारणी सदस्य प्रा. विनायक वाडेकर फाउंडेशन उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव श्री गणेश कोळी सर उपस्थित होते. प्रसंगी डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या निवासस्थानी सर्व मान्यवरांचा आदिशक्ती संत मुक्ताईची प्रतिमा भेट देऊन शाल व टोपी घालून सत्कार करण्यात आला.

No comments