ओडीशा राज्यात वाघेरेचा पैलवान विक्रम कुंदे कुस्ती स्पर्धेत विजयी... त्र्यंबकेश्वर तालुका:प्रतिनिधी जयराम बदादे (संपादक -:- हेमकांत गायकवा...
ओडीशा राज्यात वाघेरेचा पैलवान विक्रम कुंदे कुस्ती स्पर्धेत विजयी...
त्र्यंबकेश्वर तालुका:प्रतिनिधी जयराम बदादे
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
एकल अभियान राष्ट्रीय खेल कुद कुस्ती स्पर्धे अंतर्गत दि.१०/२/२०२५ रोजी.भुवनेश्वर ओडीशा येथे नुकत्याच झालेल्या शालेय कुमार राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी ग्रामीण भागातील उत्कृष्ट युवा पैलवान विक्रम पांडुरंग कुंदे यांनी अंतिम फेरीत पंजाबच्या खेळाडुला ५१ किलो वजनी गटामध्ये पराभूत करून विजय मिळवला आहे.विक्रमच्या या विजयाच्या पाठिमागे वडील पांडुरंग कुंदे यांचा खुप मोठा संघर्ष आहे, यावेळी गावकऱ्यांनी विक्रमचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments