adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय साकळी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी !!!

  शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय साकळी येथे  छत्रपती शिवाजी  महाराज यांची जयंती  साजरी   !!!  भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:...

 शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय साकळी येथे  छत्रपती शिवाजी  महाराज यांची जयंती  साजरी   !!! 


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

  दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ बुधवारी शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय साकळी येथे  छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  विद्यालयाचे प्राचार्य आर जे महाजन  हे होते तर व्यासपीठावर, पंडित साळुंके, एस. जे. पवार, बी ई महाजन,  जी एल चौधरी, वरिष्ठ लिपिक एस. पी. निळे, सदाशिव पी निळे, एन पी पाटील हे उपस्थित  होते.यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी  महाराज यांच्या प्रतिमेचे   पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य आर जे महाजन   यांनी    छत्रपती शिवाजी  महाराज यांच्या जीवानाविषयी  स्वराज्य संस्थापक, रयतेचा राजा , धर्मनिरपेक्ष राजा याविषयी  माहिती  देऊन मार्गदर्शन केले.

       या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस यु तडवी यांनी केले व आभार एन पी पाटील   यांनी मानलेत. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

No comments