adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या रावेर लोकसभा ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी योगेश सैतवाल यांची नियुक्ती

  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या रावेर लोकसभा ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी योगेश सैतवाल यांची नियुक्ती   रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक...

 महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या रावेर लोकसभा ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी योगेश सैतवाल यांची नियुक्ती


 रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. वसंतराव मुंडे साहेब यांच्या नेतृत्वात रावेर लोकसभा ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी योगेश सैतवाल यांची नियुक्ती राज्य कार्यध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी केली असून यावेळी संघटनेचे पत्रकार हल्ला कृती समितीचे खान्देश अध्यक्ष भगवान मराठे,डिजिटल मीडिया विभागाचे राज्य उपाध्यक्ष संदीप केदार,इलेक्ट्रॉनिक मीडियाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सचिन गोसावी, जिल्हाध्यक्ष भूषण महाजन,जिल्हा उपाध्यक्ष गोपाल सोनवणे आदी उपस्थित होते.

राज्यातील पत्रकारांच्या न्याय, हक्कासाठी कायम सक्रिय असणारी संघटना म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई या संघटनेची ओळख असून वसंतराव मुंडे यांच्या नेतृत्वात नुकतीच दीक्षाभूमी ते मंत्रालय संवाद यात्रा काढून पत्रकार संघटनेने राज्यातील पत्रकारांचे प्रश्न जाणून घेत शासन दरबारी मांडले होते.

ग्रामीण भागतील पत्रकारांसाठी प्रामाणिकपणे काम करणार

आजही ग्रामीण भागातील पत्रकारांनाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ग्रामीण पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड असेल किंवा पत्रकार सन्मान योजनेचा लाभ असेल ते मिळवून देण्यासाठी मी येणाऱ्या काळात वसंतराव मुंडे यांच्या नेतृत्वात प्रामाणिकपणे काम करणार असल्याचा विश्वास नवनियुक्त संघटनेचे रावेर लोकसभा ग्रामीण जिल्हाध्यक्ष योगेश सैतवाल यांनी केला.

No comments