adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अमृत प्री स्कूल मध्ये स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांच्या कलेचे सादरीकरण

  अमृत प्री स्कूल मध्ये स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांच्या कलेचे सादरीकरण अमृत प्री स्कूल मध्ये स्नेहसंमेलनाच्या वेळी शिवशंभो या गाण्यावर नृत्य...

 अमृत प्री स्कूल मध्ये स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांच्या कलेचे सादरीकरण

अमृत प्री स्कूल मध्ये स्नेहसंमेलनाच्या वेळी शिवशंभो या गाण्यावर नृत्य करताना बालकलाकार


मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड

(संपादक हेमकांत गायकवाड)

गुजरात पेट्रोल पंपा जवळील अमृत प्री स्कूल मध्ये ७ वे वार्षिक स्नेहसंमेलन घेण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारात कलागुण सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सौ. इंदुमती भारंबे आणि सद्गुरु बीएड कॉलेजच्या  प्राचार्य डॉ.सौ.अनिता वानखेडे जे.आर.डी.फाउंडेशनचे चेअरमन धनंजय अमृतकर सर आणि स्कूल प्राचार्य पूजा अमृतकर यांची उपस्थिती होती. भारंबे 

मॅडम यांनी विद्यार्थांच्या सकस आहार विषयी माहिती दिली.तर वानखेडे मॅडम यांनी पालक व मुलांचा संवाद कसा असावा. यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमांगी देशमुख आणि पूजा पाटील या शिक्षकांनी केले तसेच कोमल कुलकर्णी, हर्षा कुलकर्णी ,गायत्री पाटील, प्रतीक्षा रायगडे या शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य केले नृत्य नाटक आणि गायन यांचे सादरीकरण बालकलाकारांनी केले तसेच पारितोषिक देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले कार्यक्रमाला पालकांची उपस्थिती ही मोठ्या प्रमाणात होती.

No comments