नामदार संजय सावकारे यांचे तापी सूतगिरणी तर्फे उस्फूर्त स्वागत. चोपडा (प्रतिनिधी) (संपादक हेमकांत गायकवाड) चोपडा तालुक्यातील धरणगाव रोडव...
नामदार संजय सावकारे यांचे तापी सूतगिरणी तर्फे उस्फूर्त स्वागत.
चोपडा (प्रतिनिधी)
(संपादक हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील धरणगाव रोडवरील तापी शेतकरी सहकारी सूतगिरणी लिमिटेड या संस्थेच्या वतीने राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री नामदार संजय सावकार यांचे स्वागत करण्यात आले.
तालुक्यातील ज्येष्ठ नेते व मान्यवर तसेच सूतगिरणीचे अनेक संचालक या कार्यक्रमास उपस्थित होते.
भगिनी मंडळ शाळेत आयोजित कार्यक्रमात माजी आमदार व शेतकरी सहकारी सूतगिरणीचे चेअरमनकैलास गोरख पाटील यांनी शाल श्रीफळ देऊन त्यांना गौरविले. वस्त्रोद्योग मंत्रालय व सूतगिरण्या यांचा जवळचा संबंध आहे. सूतगिरणीचे संचालक शशिकांत पाटील, चंद्रकांत पाटील, कैलास बाविस्कर, बोरसे, कवी व साहित्यिक रमेश जे .पाटील, सुनील भाऊसाहेब पाटील, आनंद मोरे, योगेश धनगर आदी यावेळी उपस्थित होते. सुतगिरण्याबाबत आपली भूमिका नेहमी सकारात्मक राहील असेही सावकारी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

No comments