नविन पुल बाधणीने पावसाळ्यात पुरपरिस्थीतीचा प्रश्न मिटणार - आ.चंद्रकांत पाटील सव्वा कोटी निधीतून उभारले जाणार दोन पुल रावेर तालुका प्रति...
नविन पुल बाधणीने पावसाळ्यात पुरपरिस्थीतीचा प्रश्न मिटणार -आ.चंद्रकांत पाटील
सव्वा कोटी निधीतून उभारले जाणार दोन पुल
रावेर तालुका प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा बु. गावातील मध्यभागातून सांडपाणी वाहत असलेल्या नाल्यामुळे पावसाळ्यात शेजारच्या वस्त्यांमध्ये पुरपरिस्थीतीचा प्रश्न निर्माण होतो घरांमध्ये पावसाळ्यात नाल्यातील पाणी शिरुन रहिवाशांना नुकसानीचा फटका बसतो पावसाळ्यात सततची पूर परिस्थिती निर्माण होऊन पुराचे पाणी नागरी वस्तीत शिरत होते ही समस्या मोठा वाघोदा वासियांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मांडली गावकऱ्यांनी मांडलेल्या तक्रारीचा जळगांव जिल्हा परिषद चे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्या प्रयत्नामुळे मंत्री गिरीष महाजन यांनी तात्काळ दखल घेतली आणि ग्रामविकास मंत्रालय नागरीक मुलभूत सुविधा १५२५ योजनेअंतर्गत साठ-साठ लाखांचे एक कोटी वीस लाख रुपयांचे निधी मंजूर करुन दोन मोठे पूल मंजूर केले. या कामाचे भूमिपूजन मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार चंद्रकांत भाऊ पाटील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, जि.प. माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष संजय माळी, किसान मोर्चाचे राहुल महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. सरपंच अलकाबाई महाजन, प्रगतशील शेतकरी डी. के. महाजन, किशोर पाटील, राहुल पाटील, पी.एल. महाजन, डॉ. रमेश पाटील, डॉ. गुरुदत्त पाटील, अनिल चौधरी, सनी पाटील, हर्षल पाटील, सदानंद पाटील, कालू मिस्तरी, आनंद भालेराव, ग्रामपंचायत अधिकारी राहुल लोखंडे व सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते


No comments