पाचोरा तालुकातील लोहारा येथे चोरट्यांचा यथेच्छ धुमाकूळ लाखोंची चोरी.चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. ...
पाचोरा तालुकातील लोहारा येथे चोरट्यांचा यथेच्छ धुमाकूळ लाखोंची चोरी.चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद.
जळगाव प्रतिनिधी शेख जावीद
(संपादक -:- हेमकांत गायकवाड
लोहारा ता. पाचोरा,अज्ञात चोरट्यांनी लोहारा गाव लक्ष करीत बेछुट चोरी करीत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवार 25 फेब्रुवारीच्या पहाटे उघडकीस आली.बसस्थानक आवारात पवन मेडिकल, सारिका मोबाईल अँड हार्डवेअर,चौधरी इलेक्ट्रॉनिक्स, ज्योती कृषी केंद्र, नवजीवन किराणा या दुकानांचे शटरचे कुलूप गॅस कटरच्या सहाय्याने तोडून गल्ल्यातील रोख रक्कम व दुकानातील किमती वस्तू यशस्वीरित्या चोरून चोरट्यांनी पोबारा केला.दरम्यान तुकोबा निवास येथील राजेंद्र शेळके यांचे कुटुंबीय बाहेर गावी असल्याने तेथे चोरट्यांनी घरातील कपाट येथेच्छ धुंडून सामान अस्ताव्यस्त केला.मात्र त्यांच्या घरात चोरट्यांच्या हाती काही लागले नाही.त्यामुईल पुढे मोर्चा वळवून आंबेवडगाव रस्त्यावर कुंभार कुटुंबीयांच्या आजूबाजूच्या घरांना कडी लावत बंद घराचा कडीकोयंडा गॅस कटरच्या सहाय्याने कापून धान्याच्या कोठीत ठेवलेला सोन्याचा ऐवज चोरी केला. हे चोरटे चार चाकी वाहनात आलेले होते असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून,चार चाकी टायरच्या वाहनाच्या दिशा येथील मातीत दिसून आले आहेत सदर घटने लोहारेकर आता असुरक्षित असल्याचा संदेश जनमान सात गेला आहे कारण या अगोदर गावात इतक्या संख्येत दुकानात चोरी पावेतो झालेली नव्हती माहिती मिळाल्या नंतर लोहारा औट पोस्टचे सहाय्यक फौजदार अरविंद मोरे चोरीबाबत तपास होण्याकामी पंचनामा केल्याबाबत सांगत दुपार पर्यंत तक्रारदार आले नसल्याचे सांगितले सदर चोरी प्रकरणाचा तपास योग्य दिशेने लागावा या साठी पोलीस विभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे, पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे सहाय्यक फौजदार अरविंद मोरे,पोलीस नाईक राहुल बेहरे, अतुल पवार, पो. कॉ. अमोल पाटील,नामदेव इंगळे, पोलीस नाईक दीपक अहिरे यांनी घटना स्थळाला पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे अवलोकन केले या अगोदर झालेल्या चोरीचा छडा लावण्यात पोलीस प्रशासन नापास झालेले असल्याने ही संख्येने दुकानदारांची मोठ्या स्वरूपात असलेली चोरी तपास लागणार काय किंवा नुसती कागदोपत्री नोंद राहते या बाबत प्रश्नचिन्ह असून या हिम्मतबाज चोरट्यांचा तपास लागणे ही लोहारा वासियां साठी काळाची गरज आहेत.
No comments