पाचोरा शहरातील चिमुकले शिव मंदिरात वाजत-गाजत शिव-पार्वती विवाह सोहळा संपन्न. जळगाव प्रतिनिधी शेख जावीद (संपादक -:- हेमकांत गायकवाड) पाचो...
पाचोरा शहरातील चिमुकले शिव मंदिरात वाजत-गाजत शिव-पार्वती विवाह सोहळा संपन्न.
जळगाव प्रतिनिधी शेख जावीद
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पाचोरा शहरातील चिमुकले शिव मंदिरात भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या विवाह सोहळ्याचा भव्य व भक्तिमय कार्यक्रम संपन्न झाला.या निमित्ताने सकाळी प्रथम भगवान शंकराची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली.ही पालखी मिरवणूक गांधी चौक,अग्रसेन चौक, रंगार गल्ली, विठ्ठल मंदिर रोड आणि जामनेर रोड मार्गे गांधी चौकात परत आली. मिरवणुकीत ढोल-ताशा भजनी मंडळे आणि भक्तगणांच्या जय घोषांनी संपूर्ण शहर शिवमय झाले होते.शंकर-पार्वती वेशभूषा आणि मंगलाष्टके यावेळी विशेष आकर्षण म्हणजे भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या वेशभूषा परिधान करून विवाह सोहळा पार पडला.वेश भूषाधारी कलाकारांनी हा विवाह सोहळा अधिक भव्य व उत्साही बनवला.विवाह सोहळ्यात आचार्य महावीर महाराज गौड यांनी मंगलाष्टके म्हटली,ज्यामुळे वातावरण अधिक भक्तिमय व मांगल्यपूर्ण झाले.महिलांनीही उत्साहाने मंगलाष्टकांत सहभाग घेतला.महाआरती आणि प्रसाद वाटप विवाह सोहळ्यानंतर शिव-पार्वतींची भव्य महाआरती करण्यात आली. महाआरतीच्या वेळी शेकडो भाविकांनी एकत्र येऊन हर हर महादेवच्या जयघोषात मंदिर परिसर दणाणून सोडला. दिव्यांच्या उजेडात आणि भक्तिरसात न्हालेल्या वातावरणात हा सोहळा अत्यंत मंगलमय झाला.यानंतर सर्व भाविकांसाठी साबुदाणा खिचडी आणि दूध वाटप करण्यात आले. या सेवाकार्यात महिलांनी विशेष सहभाग घेतला आणि भक्तांना प्रेमपूर्वक प्रसाद वाटप करण्यात आला.आयोजनाचे विशेष सहकार्य या भव्य आयोजनासाठी मंदिर समिती,स्थानिक भाविक, तसेच विविध सामाजिक संघटनांनी विशेष सहकार्य केले. पंचक्रोशीतील तसेच शहरातील हजारो भाविक या मंगलमय सोहळ्यासाठी उपस्थित होते. संपूर्ण पाचोरा शहर या दिवशी शिवमय झाले होते.
No comments