adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नाटेश्वर मंदिर लासूर येथे दि.२४/०२/२०२५ सोमवारी स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

  नाटेश्वर मंदिर लासूर येथे दि.२४/०२/२०२५ सोमवारी स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न  यावल आदिवासी विकास विभाग सेवानिवृत्त कर्मचारी वर्गाचे स्नेहसं...

 नाटेश्वर मंदिर लासूर येथे दि.२४/०२/२०२५ सोमवारी स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न 

यावल आदिवासी विकास विभाग सेवानिवृत्त कर्मचारी वर्गाचे स्नेहसंमेलन


चोपडा प्रतिनिधी

संपादक हेमकांत गायकवाड 

यावल आदिवासी विकास विभाग सेवानिवृत्त कर्मचारी वर्गाचे स्नेहसंमेलन नाटेश्वर मंदिर लासूर येथे  दि.२४/०२/२०२५ सोमवारी  उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे आयोजक-ए डी माळी साहेब व संकल्पना  ए बी कोन्गे आणि  आर सी भालेराव यांची होती. या कार्यक्रमास सेवानिवृत्त  साधरण शंभर  व्यक्ती उपस्थित होते त्यात महिलांचाही सहभाग होता.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माळी सो.होते तर उद्घघाटक एन एन पाटील होते.स्वागताध्यक्ष सुनिल चौधरी होते.मार्गदर्शक वक्ते मा.डा.प्राध्यापक बीडीसकर सर शिरपुर महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि मा.डा.प्राध्यापक जगताप सर ,प्रताप महाविद्यालयाचे प्राध्यापक होते त्यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून सेवानिवृत्ती नंतर जीवन कसे व्यतीत करावे आणि नकारात्मक टाकून सदैव सकारात्मक आनंदी राहून समाज रुण आपले योगदान देऊन फेडले पाहीजे. 

लासूर परिसराचे महत्व विशद करत ऐतिहासिक व पौराणिक अशा सातपुड्याच्या रमणिय परिसरात अहिल्या देवी व छ.शिवाजी महाराज यांच्या पावनस्पर्षाने पुणित झालेली ही पवित्र भूमी आहे , अशा गौरवोद्गाराने महती विशद केली.

या ठिकाणी  तळोदा हुन एस एन पाटील सपत्निक,नाशिकहून बी डी महाजन सपत्निक,शिरपूरहून सी डी बोरसे सपत्निक असे आठ जोडपे आणि मोठ्या संख्येने सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचा स्नेह संमेलन मोठ्या आनंदे सुरूची भोजनाच्या स्वाद घेतला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ए बी कोन्गे यांनी केले ,पाहुण्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व मंचावर सर्वानी दीप प्रज्वलीत करून कार्यक्रमाची सुरवात झाली. नंतर मध्यंतरी एम बी तडवी याचे अगमन झाले त्यांचा ही यथोचीत स्वागत एवंम सत्कार झाला,अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय संभाषणात माळी सो यांनी पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष आबा सो.यांना दोन मिनिटे शांत राहून श्रद्धांजली वाहिली व आपण सर्व एकदुसर्याचे मित्र झालोत दुःखात सुखात एकमेकांस सहकार्य करण्याचे अवहान करत ,आलेल्या सर्वच पेन्शनर व वक्ते यांचे स्वागत एवंम आभार ही मानलेत. सुत्रसंचालन सुनिल चौधरी व आर सी भालेराव यांनी केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

              

No comments