adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूरची खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनल खर्चे खेळणार आंतरराष्ट्रीय सॉफ्ट टेनिस स्पर्धा

  स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूरची खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनल खर्चे खेळणार आंतरराष्ट्रीय सॉफ्ट टेनिस स्पर्धा अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक ...

 स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूरची खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर

सोनल खर्चे खेळणार आंतरराष्ट्रीय सॉफ्ट टेनिस स्पर्धा


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पुढील महिन्यात १६ ते २२ मार्च २०२५ नोएडा उत्तरप्रदेश येथे होणाऱ्या आतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी स्पोर्टस झोन ऑफ मलकापूर ची व सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स असोसिएशन बुलढाणा ची खेळाडू सोनल गणेश खर्चे यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालली विदर्भातील पहिली खेळाडू असुन सोनल तालुका क्रीडा संकुल मलकापूर येथे असलेल्या सॉफ्ट टेनिस कोर्ट मध्ये सराव करणारी खेळाडू आहेत आंतरराष्ट्रीय स्पधेत निवड झाल्याने आपल्या राज्यचा व बुलढाणा जिल्हाचा व मलकापूर शहराचा नाववलोकिक वाढविला आहेत

  यापूर्वी स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूर ची खेळाडू गौरी मंगलसिंग सोळंक इंग्लंड व न्यूझीलंड व सुचित्रा अजय साखरे थायलंड येथे तलवारबाजी खेळात तर कुणाल वासुदेव बोराडे यांनी चॉकबॉल खेळात हॉगकॉग येथे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले असुन स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूर ची सोनल ही चौथी आंतरराष्ट्रीय खेळाडू असुन विजय पळसकर क्रीडा मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मलकापूर शहरातील खेळाडू खेळत आहे

    सोनल ने २०२० पासून सॉफ्ट टेनिस या खेळामध्ये विजय पळसकर सचिव व क्रीडा मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला खेळाला सुरुवात केली तेव्हापासून आजपर्यंत भरारी झेप घेत तालुकास्तरापासून आज आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड झालेली आहे ही पहिली वहिला खेळाडू म्हणून तिने आपले स्थान निर्माण केले सोनल ने आजायागत जवळपास सात राष्ट्रीय स्पधेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले असुन अनेक राष्ट्रीय स्पधेत महाराष्ट्र संघाला पदक मिळविण्यामध्ये सिहंचा वाटा उचलला होता तसेच महाराष्ट्र शासनाचा मिनी ओलंपिक स्पधेत बुलढाणा जिल्हा संघाला कास्यपदक मिळवून दिले होते गेल्या दोन वर्षापासून शालेय राष्ट्रीय स्पधेत सांघिक प्रकारात मध्ये गोल्ड मेडल मिळवलेले आहे तसेच मिनी ओलंपिक स्पधेत वेक्तिक डबल्स मध्ये पण सिल्वर मेडल पटकावले आहे

  आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाल्याबद्दल मलकापूर शहरातून प्रत्येक स्तरातून सोनल चे अभिनंदन व सत्कार होत आहे जिल्हा क्रीडाअधिकारी बाळकृष्ण महानकर सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष संतोष बोरगावंकर कार्याध्यक्ष राजेश महाजन जिल्हा संघटनेचे सचिव विजय पळसकर तालुका क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव खनिजदार राजेश्वर खगार प्रा नितीन भुजबळ चंद्रकांत साळुंखे शिवराज जाधव व अतुल जगदाळे आदींनी व सोनल चे आई वडील यांनी अभिनंदन केले असुन आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments