बोल्हेगाव परिसरात तोफखाना पोलिसांची धडक कारवाई: अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले अवैध धंद्यांचे पत्र्याचे शेड जेसीबीच्या साह्याने उध्वस्त ...
बोल्हेगाव परिसरात तोफखाना पोलिसांची धडक कारवाई: अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले अवैध धंद्यांचे पत्र्याचे शेड जेसीबीच्या साह्याने उध्वस्त जिल्ह्यातील अशी पहिलीच कारवाई
अहिल्यानगर (दि.२३ फेब्रुवारी):-
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतील बोल्हेगाव परिसरात तोफखाना पोलिसांनी वेळोवेळी अवैध धंद्यांवर कारवाई करून सुद्धा छुप्या पद्धतीने अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरू झाल्याने पोलिसांनी अवैध धंद्यांवर डायरेक्ट जेसीबी नेत अवैध धंद्यांचे पत्र्याचे शेड जमीनदोस्त केले आहे. ही कारवाई शनिवार दि.२२ फेब्रुवारी रोजी करण्यात आली आहे.या कारवाईमध्ये १० हजार ५०० रुपयांची१०५ लिटर गावठी हातभट्टी जप्त करण्यात आली असून ४ स्वतंत्र दाखल करण्यात आले असून चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे,मसपोनि/कल्पना चव्हाण,पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे,पोहेकॉ/दत्तात्रय जपे,अहमद इनामदार,दीपक जाधव,सतीश त्रिभुवन, सतीश भवर,बाळासाहेब भापसे यांनी केली आहे.

No comments