पोलिसांच्या नव्या वसाहतीसाठी ११५ कोटी रुपये मंजूर आ.संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर अहिल्यानगर (प्रतिनिधी):- (संपादक -:-हेम...
पोलिसांच्या नव्या वसाहतीसाठी ११५ कोटी रुपये मंजूर आ.संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर शहरातील सर्जेपुरा येथे असलेल्या पोलीस मुख्यालय येथील जागेवर सध्या असलेली घरे पाडून तेथे नवे बहुमजली अपार्टमेंट उभारून ३२० टू बीएचके फ्लॅट बांधण्यात येणार आहेत.या संपूर्ण कामासाठी सुमारे ११५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाने पोलीस वसाहतीच्या कामांना मंजुरी दिली आहे. याबाबत आमदार संग्राम जगताप यांनी पाठपुरावा केला असल्याचे, आविष्कार ग्रुपचे मनोजकुमार जाधव यांनी सांगितले.शहरातील लालटाकी रोडवरील पोलीस मुख्यालयाच्या जागेत असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या शासकीय वसाहतीची दुरावस्था झाली.त्यामुळे याठिकाणी नवीन इमारत व पोलीस निवासस्थानाच्या नव्या बांधकामासाठी आमदार संग्राम जगताप यांनी २०२३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे मागणी केली होती. या पाठपुराव्यास यश आले असून महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे.

No comments