सेठ बि जे संचेती लोकसेवा ट्रस्ट च्या वतीन मोफत कृत्रिम हात व पाय शिबिर संपन्न अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापूर - स...
सेठ बि जे संचेती लोकसेवा ट्रस्ट च्या वतीन मोफत कृत्रिम हात व पाय शिबिर संपन्न
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर - स्थानिक सेवाभावी संस्था सेठ बि जे संचेती लोकसेवा ट्रस्ट व साधु वासवाणी मिशन पूणे यांचे संयुक्त विद्यमाने परिसरातील गरजू अपंग व्यक्तींसाठी मोफत कृत्रिम हात व पाय मोजमाप शिबिर दि. १६ /०२ / २०२५ रोजी आत्मानंद दरबार येथे संपन्न झाले.
सदर छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री दामोदरजी लखाणी हे होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये श्री अमरचंदजी संचेती, श्री जीवनलाल भंसाली व श्री पूरुषोत्तमजी व्यास हे होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला स्व. राणीदानजी संचेती यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून शिबिराला सुरूवात करण्यात आली. या शिबिरात मलकापूर व विदर्भातील गरजू १३५ अपंग व्यक्तींनी हजर राहून लाभ घेतला. साधु वासवाणी मिशन पूणे यांचे तज्ञ डॉक्टरांच्या चमूने अपंग रूग्णांच्या तुटलेल्या हात पायांची तपासणी करून मोजमाप घेतले. या • शिबिरात मोजमाप घेतलेल्या व्यक्तींना त्यांच्या व्यंगावर मात करण्यासाठी अद्यावत टेक्नॉलॉजी द्वारा फायबर पासून निर्मित अत्यंत हलके व मजबूत, टिकावू कृत्रिम अवयव तयार करून देण्यात येतील, की ज्यामुळे या व्यक्ती चालू शकणार, सायकल चालवू शकणार, टेकडी सुध्दा चढू शकणार असून त्यांचे दैनंदिन कामे स्वतः करू शकणार आहेत. त्याचबरोबर साधु वासवाणी मिशन पूणे यांचेमार्फत या व्यक्तींना व्हील चेअर, ट्रायसिकल, कुबड्या, कॅलीपर व काठ्या मोफत उपलब्ध करून देण्यात येतील.
या शिबिरप्रसंगी उपस्थित अपंग व्यक्ती व त्यांचे सोबत आलेल्या पालकांसाठी सेवाभावी संस्था सेठ बि जे संचेती लोकसेवा ट्स्ट यांचे वतीने अल्पोपहार व चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रहार जनशक्ती संघटनेचे श्री अजय टप, श्री शालीग्राम पाटील, श्री बळीराम बावस्कर, दिव्यांग मल्टीपरपज फाउंडेशन या अपंग सेवा संघटनेचे श्री निलेश चोपडे, श्री नागेश सुरंगे, अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे श्री कलीम शेख, श्री सचिन मोरे, हनुमान सेनेचे श्री अमोल टप, श्री नानाभाउ ऐशी, ओमशांती सेवा समितीचे श्री सचिन भंसाली तसेच समाजसेवक श्री चंद्रकांतजी वर्मा, श्री संतोषजी संचेती, श्री अॅड. अशोकजी संचेती, श्री अमितजी संचेती, श्री धीरजजी संचेती, श्री डॉ अंकुरजी संचेती, श्री संजयजी श्रीश्रीमाळ व श्री सार्वजनिक वाचनालयाचे कर्मचारी, मुकबधीर मतिमंद विद्यालयाचे कर्मचारी, श्री आत्मानंद जैन प्राथमिक शाळेचे कर्मचारी इत्यादींनी परिश्रम घेतले.


No comments